मावळ ऑनलाईन – डॉ. अलकनंदा सारंग माताडे यांचा शोधनिबंध टोकियो,जपान येथील भाषा ( Dr. Alaknanda Matade) परिषदेत सादर होणार आहे. जागतिक इंग्रजी साहित्यातील वंश व जातीयतेचे प्रतिनिधित्व: एक तुलनात्मक विश्लेषण ( Representation of Race and Ethnicity in Global Literature ) या त्यांच्या शोधनिबंधाची निवड अतिशय प्रतिष्ठेच्या असणाऱ्या १५ व्या इंग्रजी भाषा, साहित्य आणि भाषा विज्ञान आंतरराष्ट्रीय परिषदेत झाली आहे.
सदर परिषदेत शोधनिबंध सादर करण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी त्यांना २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ओत्सुमा महिला विद्यापीठ,टोकियो येथे आमंत्रित केले आहे. डॉ. प्रा.अलकनंदा या २५ वर्ष इंग्रजी भाषा अध्यापनाचे काम करत( Dr. Alaknanda Matade) आहेत. त्यांनी इंग्रजी भाषा ज्ञान व व्यक्तिमत्व विकास कौशल्ये यांचे रोजगार क्षमतेतील महत्व या विषयात पीएचडी प्राप्त केलेली आहे.
Saraswati Vidya Mandir : सरस्वती विद्यामंदिरात वंदे मातरम गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव
विविध महाविद्यालये व रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेतात. त्या माजी शिक्षक आमदार कै तु.ना माताडे सर व माजी मुख्याध्यापिका कै पुष्पा माताडे यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या या यशासाठी त्यांना विविध सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी फोन करून त्यांचे अभिनंदन ( Dr. Alaknanda Matade) केले आहे.




















