मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यामध्ये अग्रगण्य (Dolasnath Society) असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते सोमवार दि. 20 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांनी दिली.
Shrikrishna Zakatdar : श्रीकृष्ण जकातदार यांचे ज्योतिष शास्त्रातील कार्य मोलाचे – उदयराज साने
या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, (Dolasnath Society) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार,आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय भेगडे,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे, सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा नागरी सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्मा भोसले, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे, कामशेत,देहू आणि सोमाटणे येथे शाखा असून मुख्य कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास मावळ तालुक्यातील संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक व नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेचे आधारस्तंभ, माजी नगरसेवक संतोष भेगडे व अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी केले (Dolasnath Society) आहे.