मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ येथील केशवनगर मधील ८ वर्षीय मुलीवर भटक्या चार ते पाच श्वानांनी (Dog attack) बुधवारी (दि ६) जीवघेणा हल्ला केला.यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
कु प्रियांशु पवन गायकवाड (वय८) असे या मुलीचे नाव आहे. चार-पाच श्वानांनी हल्ला केला त्यावेळी तेथील नागरिकांनी धाव घेत चिमुकलीचा जीव वाचवला.तिला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तब्येत स्थिर आहे. वडगाव शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिक व लहान मुलांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे.
भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली (Dog attack)आहे.
PMC : महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा
निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी मावळ तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे,वडगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रवीण ढोरे, वडगाव शहर युवक अध्यक्ष अतुल ढोरे,संतोष निघोजकर,अक्षय बेल्हेकर,तानाजी धडके,गणेश झरेकर,विकास कदम आदी उपस्थित होते. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अशी दुर्दैवी घटना परत वडगाव शहरात घडू नये याबाबतची खबरदारी वडगाव नगरपंचायतने घ्यावी, असे निवेदनात म्हटले (Dog attack)आहे.