Team MyPuneCity – पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (Dhaari News)मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २४ एप्रिल २०२५ रोजी जुनी धायरी परिसरातील मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती थांबविणे आणि पारे कंपनी रोडवरील तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवसासाठी काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच, शुक्रवार, दि. २५ एप्रिल २०२५ रोजी संबंधित भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
या कामामुळे पारे कंपनी रोड, गणेश नगर, लिमये नगर, गारमळा, गोसावी वस्ती, बरांगणी मळा, दळवी वाडी, कांबळे वस्ती, मानस परिसर, नाईक आळी, यशवंत विहार बुस्टर परिसर, लेन क्रमांक १० ते ३४ (ए आणि बी दोन्ही बाजू), रायकर नगर, चव्हाण बाग आणि त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसर या भागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
महापालिकेने नागरिकांनी वेळेवर पाण्याचा साठा करून कामकाजाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या कामामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.
https://youtu.be/AwU80BMOQnY?si=uOced68scXG6Smoi



















