situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Devghar Illegal Banglows : मावळातील देवघर गावात अनधिकृत बंगल्यांचे साम्राज्य! माहिती अधिकार कार्यकर्त्याची तहसीलदारांकडे तक्रार

Published On:
Devghar Illegal Banglows
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील देवघर गावात अनधिकृत बांधकामांची (Devghar Illegal Banglows) मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, या भागात बिनधास्तपणे बंगल्यांचे बांधकाम करून ते भाड्याने दिले जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वडगाव मावळच्या तहसीलदारांकडे तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

देवघर हे गाव निसर्गरम्य परिसरात व जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असल्यामुळे गुंतवणूकदारांची नजर या भागावर गेली असून, त्याठिकाणी परवानगीशिवायच सर्रास खरेदीखते करून भव्य बंगल्यांचे अनधिकृत बांधकाम (Devghar Illegal Banglows) करण्यात आले आहे. हे बंगले नंतर भाड्याने दिले जात असून, बंगल्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारावर कुठलाही शासकीय कर भरला जात नसल्यामुळे महसूल यंत्रणेला मोठा फटका बसत आहे, असा आरोप नाईक यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

Maval Action : मंगरुळ परिसरात बेकायदेशीर उत्खननावर महसूल खात्याची मोठी कारवाई; २५ वाहने जप्त, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सर्वात गंभीर बाब म्हणजे या बंगल्यांमध्ये (Devghar Illegal Banglows) रात्रीच्या वेळी रेव्ह पार्टीसारखे अनैतिक प्रकार सर्रासपणे चालू असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. बाहेरून आलेल्या मुली, मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन आणि गोंगाटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. तक्रार करायला गेले, तर “बाहेरचे श्रीमंत धनदांडगे लोक” असल्याने जिवाला धोका निर्माण होतो, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या अनधिकृत बांधकामांमुळे गावातले रस्तेही बाधित झाले आहेत. बंगल्यांच्या बांधकामातून निघालेला राडारोडा रस्त्यावर फेकण्यात आला असून, त्यामुळे धूळ, घाण, व वाहतुकीला अडथळा यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

Ahmedabad plane crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू; एकच प्रवासी बचावला, देशभरात शोककळा

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या सर्व प्रकरणात प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवत म्हटले आहे की, “पिंपरी-चिंचवड महापालिकेने जसे अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवले, तशीच कारवाई मावळ तालुक्यात (Devghar Illegal Banglows) व्हावी. प्रशासनाने जर वेळेत कारवाई केली नाही, तर यामुळे कायद्याचा वचक उरणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला अन्याय सहन करत राहावे लागेल.”

या संपूर्ण प्रकारामुळे मावळातील देवघर गावात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता तहसील प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यावर काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us On

Also Read