मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील देवघर गावात वाढलेल्या अनधिकृत बंगल्यांचा मुद्दा आता प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य सचिव प्रदीप नाईक यांच्या जोरदार तक्रारीनंतर वडगाव मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी संबंधित मंडलाधिकारी यांच्याकडून थेट सविस्तर चौकशी अहवाल (Devghar Enquiry) मागवून कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या पावलामुळे अवैध बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
निसर्गरम्य आणि जुना मुंबई–पुणे हायवे लगत असलेल्या देवघर (गट नं. 250) परिसरात अनेक गुंतवणूकदारांनी परवानगी न घेता भव्य बंगले उभारले आहेत. हे बंगले भाडेतत्त्वावर देऊन मालक मोठा आर्थिक फायदा (Devghar Enquiry) कमावत असून, प्रशासनाचा कर बुडवत असल्याचा गंभीर आरोप नाईक यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे निर्माण झालेला राडारोडा, धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
Dighi Crime News: दिघी येथे दुकानातील वादातून तरुणाची हत्या, दोघे ताब्यात
नाईक यांच्या मते, या बंगल्यांमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश देऊन रेव्ह पार्टीसारखे अवैध धंदे सुरू आहेत. अशा कार्यक्रमांमुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार केल्यास बाहेरील गटांकडून जिवाची भीती असल्याने अनेक ग्रामस्थ गप्प बसत आहेत.
यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जसा अनधिकृत बंगले पाडण्याचा निर्णय घेतला होता, तशीच तातडीची कारवाई मावळ तालुक्यात व्हावी, अशी ठाम मागणी नाईक यांनी तहसीलदारांकडे केली आहे. “कायद्याचा धाक आणि प्रशासनाचा वचक राखण्यासाठी ही कारवाई (Devghar Enquiry) अनिवार्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Golden Rotary : गोल्डन रोटरीच्या तिरंगा रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद
तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मंडलाधिकारी यांच्याकडून चौकशी अहवाल मागवला असून, अहवाल आल्यानंतर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावातील अवैध बांधकामांच्या मालकांसाठी निश्चितच ही धोक्याची घंटा ठरणार आहे.