मावळ ऑनलाईन – जागतिक वारसा यादीत समाविष्ट ( Devendra Fadnavis ) असलेल्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास १० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षित भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे लोहगड परिसरात ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
ही भेट फडणवीस यांच्या खाजगी दौऱ्याचा भाग होती. ( Devendra Fadnavis ) व्यस्त कार्यक्रमातून काही क्षण काढत त्यांनी लोहगड किल्ल्याला भेट दिली आणि परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने मन:पूर्वक स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोहगड किल्ल्याचा ( Devendra Fadnavis ) इतिहास, त्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व, तसेच स्थानिकांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या. लोहगड-विसापूर विकास मंचाच्या सदस्यांनी यावेळी फडणवीस यांना मंचाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच परिसराच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे सविस्तर विवरण मांडले.
PMC : पुणे महापालिकेत मोठा फेरबदल : उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
कार्यकर्त्यांसाठी ही भेट एक सुवर्णक्षण ठरली. त्यांच्या मते, भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ दिल्यास लोहगड पायथ्याशी भव्य ‘शिवसृष्टी प्रकल्प’ उभारण्याबाबत ( Devendra Fadnavis ) चर्चेला गती मिळेल.
या अनपेक्षित भेटीमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लोहगड परिसरात पर्यटनविकास आणि स्थानिक रोजगाराच्या नव्या शक्यता खुल्या होतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त ( Devendra Fadnavis ) केला.



















