मावळ ऑनलाईन – कॅन्टोन्मेंट बोर्डाला केंद्र सरकार व राज्य सरकार ( Dehuroad News) यांच्याकडून निधी उपलब्ध होत नसल्याने नागरी सुविधासह विविध विकास कामे होत नाही. राज्यभरातील इतर कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त होऊन स्वतंत्र नगरपरिषदा किंवा नगरपालिकेत विलीनीकरण झाले. देहूरोडला स्वतंत्र नगरपंचायत किंवा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला होता.
Nana Kate : विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त माउलीच्या मंदिराला देणगी
मात्र संवेदनशील भाग असल्याने स्वतंत्र नगरपंचायत करता येत नसल्याचे ( Dehuroad News) यावेळी स्पष्ट सांगण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देहूरोडचे शिष्ट मंडळ, केंद्रीय मंत्र्यांना भेटून आगामी आठ किंवा पंधरा दिवसांमध्ये चर्चा करेल. त्यावेळी केंद्र सरकार ज्या पद्धतीने कृती करेल. त्याप्रमाणे त्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ. तोपर्यंत राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याकडे काही मार्ग निघेल याची चर्चा करा. तोपर्यंत सहकार्य करा. जनतेचा जो निर्णय असेल त्या निर्णया सोबत सुनील शेळके असेल. या विषयाला राजकीय रंग आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. ही राजकारण करण्याची वेळ नाही. असे स्पष्टोक्ती आमदार सुनील शेळके यांनी केली.
Rashi Bhavishya 11 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
देहूरोड कॅन्टोन्मेंट बरखास्त करून स्वतंत्र नगरपरिषद निर्माण होण्यासह विविध मागण्या साठी देहूरोड शहर कॅन्ट कृती समितीच्या वतीने रविवारी ( दि.१० ) मोर्चेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते. कृती समितीच्या वतीने सकाळी अकराच्या सुमारास ( Dehuroad News) देहूरोड शंकर मंदिर येथून मोर्चाचे प्रारंभ करण्यात आला.
” देहूरोड बचाव, कॅन्टोन्मेंट हटाव. डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय, देहूरोड स्वतंत्र नगरपरिषद झालीच पाहिजे, देहू देहू रोड पालखी मार्ग चौपदरीकरण झालेच पाहिजे ” अशा विविध घोषणा देत मोर्चा अबूशेठ मार्ग,भाजी मंडई, बाजार पेठ,सुभाषचंद्र बोस चौक मार्गे जोरदार घोषणा देत स्वामी विवेकानंद चौकामध्ये उड्डाण पुलाखाली आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज , नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहारार्पण करण्यात आला.
मोर्चेमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, मंडळे, स्वयंसेवी संघटना, संस्था, भाजीपाला विक्रेता, लघु व्यावसायिकांसह व्यापारी,परिसरातील नागरिक,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून मोर्चेला पाठिंबा दर्शवित प्रतिसाद दिला होता. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी उपस्थित होता. माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे ,आमदार शेळके यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते माजी नगरसेवक आदींनी मनोगत व्यक्त करीत स्वतंत्र नगर परिषदेची मागणी ( Dehuroad News) केली.