मावळ ऑनलाईन – देहूरोड येथे थॉमस कॉलनी जंगल परिसरालगत एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (12 जून) पहाटे उघडकीस आली. हा खून लव्ह ट्रँगल मधून झाला आहे. खून झालेल्या तरुणाचा चुलत भाऊ आरोपीच्या हल्ल्यात जखमी झाला( Dehuroad Murder News) आहे.
दिलीप मोरिया (16) असे खून झालेल्या तरुणाचे नावे आहे. अरुण मोरीया (14) हा जखमी झाला आहे. सनी सिंग (शिवान, बिहार) असे आरोपीचे नाव आहे.
Nigdi : पालखी मार्ग बदलण्याच्या हालचालींवरून संतप्त प्रतिक्रिया – परंपरेत हस्तक्षेप नकोच!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमटणे फाटा येथील एका तरुणीचे दिलीप याच्यासोबत प्रेमासंबंधी होते. त्याच तरुणीचे सनी सिंग याच्यासोबतही प्रेम संबंध होते. तीन महिन्यांपूर्वी त्या दोघांचे या कारणावरून भांडण झाले होते. बुधवारी रात्री सव्वा दिलीप याने अरुण याला फोन करून थॉमस कॉलनी जवळ जंगल परिसरात बोलावून घेतले. तिथे सनी सिंग आणि दिलीप यांचे भांडण झाले. भांडण सोडविण्यासाठी अरुण मध्ये पडला. सनी याने अरुण वर चाकूने हल्ला केला. अरुण जखमी अवस्थेत थॉमस कॉलनी मध्ये आला. त्याने मित्रांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अरुण याला कंटोनमेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र थॉमस कॉलनी जवळील जंगल परिसरात दिलीप याचा शोध लागला नाही. रात्रभर पोलीस दिलीपचा शोध घेत होते. गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गालगत सर्विस रोडच्या खाली दिलीप याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. याबाबत देहूरोड पोलीस तपास करीत ( Dehuroad Murder News) आहेत.