ऑनलाईन मावळ – देहूरोड येथील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तब्बल नऊ वर्षांनी वडगाव मावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरकोळ कारणावरून मित्रांनीच 2016 साली हा खून केला ( Dehuroad Crime News ) होता.
आरोपी प्रमोद उर्फ बंटी जाधव,अक्षय उर्फ प्रकाश ओव्हाळ, बाळू उर्फ रणजीत दळवी या तिघांना ही शिक्षा सुनावली आहे. यातील आरोपी प्रमोद जाधव याने मयत मोसीन मोहमद शेख याचा डोक्यात दगड घालून खून केला.या खूनात इतर आरोपींनी त्याला मदत केली.
Lonavala : फि न भरल्याने शाळेचा दाखला नाकारणाऱ्या शाळेला मनसे स्टाईल दणका
मोसीन याला आरोपींनी दारू पिण्याच्या बहाण्याने नेले व तू सतत आमच्याशी का वाद घालतोस म्हणत त्याला मारहाण करत डोक्यात दगड घालून खून केला होता. खूनानंतर आरोपींनी मोसीन याच्या खिशातील मोबाईल व पैसे चोरून नेले ( Dehuroad Crime News ) होते.
Hadapsar Crime News : चार चाकी गाडीमध्ये येऊन घरफोडी करणारे आरोपी जेरबंद
हा खून 2016 साली झाला होता. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.सरकारी वकील म्हणून स्मिता चौघुले यांनी युक्तीवाद केला. तर देहुरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे , तत्कालीन पोलीस अधिकारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गौंडे, अशा घाटे यांनी पाठपुरावा केला ( Dehuroad Crime News ) होता.