मावळ ऑनलाईन – गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांची सदनिका विक्रीच्या ( Dehuroad Crime News ) नावाखाली १ कोटी ८४ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही घटना १० जून २०२१ ते २३ जून २०२३ या कालावधीत अरुण्या सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बी विंग, माळीनगर, देहूरोड येथे घडली आहे.
Maval Crime News : टँकरमधून रॉकेल चोरी करत असताना एकाला अटक दोघे पसार
या प्रकरणी अक्षय जगन्नाथ यादव (२८, माळीनगर, देहूरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू गोरखनाथ माळी, संदीप गोपालभाई पटेल, मनोज सुर्यकांत मेहता, एक महिला आरोपी, राकेश राजाराम कंडालकर, सचिन गोरख माळी, विनोद साहेबराव परंडवाल, विशाल मनोहर मुऱ्हे आणि देवेंद्र देवराम देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात ( Dehuroad Crime News ) आला आहे.
Pimpri Chinchwad Crime News 28 August 2025 : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डकॉम या कंपनीच्या भागीदारांनी अरुण्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील १४ सदनिका श्री भैरवनाथ पतसंस्था, भोसरी येथे १० जून २०२१ रोजी गहाण ठेवल्याची माहिती असताना देखील, त्यांनी त्याच सदनिका फिर्यादी आणि इतर लोकांना विकल्या. आरोपींनी या सदनिका गहाण ठेवल्याची नोंदणी रेरा आणि इतर ठिकाणी न करता फसवणूक ( Dehuroad Crime News ) केली. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.