तोतया पत्रकारांसह चार जणांवर गुन्हा (Dehuroad Crime News)
Team MyPuneCity – माहिती अधिकार कार्यकर्ता आणि तोतया पत्रकाराने देहूरोड येथील एका व्यक्तीला त्याच्या घरावर कारवाई करण्याची भीती दाखवली. त्यासाठी व्यक्तीकडून 50 हजार रुपयांची खंडणी घेतली. ही घटना शनिवारी (6 जून) रोजी मेन बाजार देहूरोड येथे घडली.
राजू मारीमुत्तू, चंद्रशेखर पात्रे, रामदास ताठे, बाबू टेकल (देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रिंकू सत्येंद्रपालसिंग मल्होत्रा (34, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस (Dehuroad Crime News) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Rajgurunagar : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चैतन्य संस्थेतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या जुन्या वडिलोपार्जित घराच्या जागी बांधकाम करत आहेत. त्या बांधकामावर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून अतिक्रमण कारवाई करण्यासाठी तक्रार देऊ अशी आरोपी राजू मारीमुत्तू याने फिर्यादी यांना धमकी दिली. त्यानंतर तोतया पत्रकार चंद्रशेखर पात्रे, रामदास ताठे आणि बाबू टेकेल यांना फिर्यादी यांच्या बांधकामा जवळ पाठवून व्हिडिओ शूटिंग काढले. त्यानंतर कारवाई बाबत तक्रार न करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 50 हजार रुपयांची खंडणी घेतली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Maval Missing Boys : हॉस्पिटलमध्ये गेलेल्या आजीची नातवंडे झाली बेपत्ता