Team My pune city – भरधाव वेगात असलेल्या कारने (Dehuroad Accident) एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. या धडकेत त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून, खांदा आणि मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी देहुरोड येथे मुंबई-पुणे हायवेवर घडली.
Bramhan Mahasangh : ब्राह्मण महासंघाच्या संघटनात्मक वाढीसाठी मेळावे, संमेलने आवश्यक – डॉ. गोविंद कुलकर्णी
याप्रकरणी प्रजिष वासुदेवन नायर (३५, किवळे) यांनी देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच १४/डीएक्स ७६८४) चालकाविरुद्ध गुन्हा (Dehuroad Accident) दाखल करण्यात आला आहे.
Sunil Shelke : लोणावळा नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर आमदार सुनील शेळके यांचा थेट हल्लाबोल!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मोठा भाऊ प्रजित हा कामासाठी देहुरोडहून पिंपरीकडे दुचाकी वरून जात होता. देहूरोड येथे आर्मी युनिट २९ जवळ त्याच्या (Dehuroad Accident) पाठीमागून आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली.
या धडकेत प्रजितच्या डोक्याला, चेहऱ्याच्या डाव्या बाजूला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. तसेच, त्याच्या डाव्या खांद्याजवळ, डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ आणि मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले आहे. देहुरोड पोलिस तपास करत (Dehuroad Accident) आहेत.