समारिटन(SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व या द्वारे १०८ चा त्वरीत प्रतिसाद
मावळ ऑनलाईन –जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या आषाढीवारी पायी पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अत्यावश्यक वैद्यकीय सेवा १०८ आरोग्य विभाग सज्ज झाला असून यंदा प्रथमच वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या १० पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका व कार्डियाक रुग्णवाहिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच रुग्ण सेवे बरोबरच भाविक व वारकऱ्यांसाठी १०८ च्या माध्यमातून समारिटन(SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व हे अॅप्लिकेशन सुरु केले असून यावर वारकऱ्यांना तात्काळ प्रतिसाद मिळून वैद्यकीय सेवा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. त्याच प्रमाणे या समारिटन(SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व अॅप्लिकेशनच्या द्वारे १०८ रुग्णवाहिकेला कोणत्या ठिकाणी रुग्णाला मदत हवी आहे हे तात्काळ कळणार असल्याने ही व्यवस्था वारकऱ्यासाठी जीवनदायी ठरणार आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. प्रियांक जावळे म्हणाले की, यंदा वारीमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण वाहिका व कार्डियाक रुग्णवाहिका असतील. याप्रत्येक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व चालक असणार आहे. रुग्णवाहिकेत या कर्मचाऱ्यांसमवेत मुबलक प्रमाणात अत्यावश्यक औषधे उपलब्ध असणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सहकार्य होणार आहे.
या रुग्णवाहिका श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत देहू ते पंढरपूर, आळंदीते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी व सासवड ते पंढरपूर श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्या वारीच्या वाटचाली सोबत त्याच प्रमाणे राज्यातील इतर मानाच्या ७ पालख्यांसोबत या रुग्णवाहिका प्रत्येकी चार असणार आहेत. मुक्कामाच्या जवळच्या ठिकाणाच्या परिसरातील प्रत्येकी अधिकच्या तीन रुग्णवाहिका तैनात केलेल्या असतील अशा प्रत्येक दिवशी पालखी सोहळ्या सोबत पुढील टप्प्यांपर्यंत ७ रुग्णवाहिका असणार आहेत.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा (१०८) विभागासाठी शासनाच्या आरोग्य विभाग व SPERO स्पेरो यांच्या संयुक्त विद्यमाने समारिटन(SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व हे अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून रुग्णाला थेट १०८ ची अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण तात्काळ कळणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका तेथे उपचारासाठी दाखल होईल. यासाठी वारकरी व भाविकांनी अॅपल स्टोर व स्मार्च फोनसाठी गुगल स्टोर वरून हे अॅप्लिकेशन डाऊनलोक करून घेवून स्थापित(इंन्स्टॉल) करावे लागेल. या शिवाय हे समारिटन(SAMARITAN) अॅप्लिकेशन https://play.google.com/store/apps/details?id=com.app.good_sam या लिंक द्वारे देखील स्थापित केले जाऊ शकते.
Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार
वारकऱ्यांना या समारिटन च्या माध्यमातून पीपीटी द्वारे रुग्णवाहिका रुग्णापर्यंत येई पर्यंत लक्षणांप्रमाणे काय काय प्रथमोपचार करावा याची माहितीही दिलेली आहे. या बाबतची माहिती डॉ. जावळे यांनी श्री संत तुकाराम महाराज संस्थान व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्ताना भेटून दिली आहे. या अॅप्लिकेशनचा लाभ वारीतील सहभागी प्रत्येक वारकऱ्यांनी घ्यावा असे अवाहन आरोग्य विभागाच्या वतीने व श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले.