मावळ ऑनलाईन – संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे एक व चौघडा गाडीची एक बैल जोड्या देहूमध्ये दाखल झालेले (Dehugaon) असून या बैलांची गुरूवारी (दि.१२) पाहणी करून वैद्यकीय आरोग्य तपासणी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आली.
ही तपासणी पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, मावळ तालुका पशु संवर्धन अधिकारी डॉ. अनिल परंडवाल, पशु वैद्यकीय दवाखाना येलवाडी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. नम्रता आंबेकर उपस्थित होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैलांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. तसेच पालखी सोहळ्या मध्ये बैलांच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन देखील करण्यात (Dehugaon)आले.
यंदा प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी रथासाठी दोन बैल जोड्या व चौघडा गाडीसाठी एक बैलजोडी खरेदी केली करण्यात आली आहे. यामुळे पालखी रथासाठी बैलजोडी निवड प्रक्रीया राबविण्यात आली नव्हती. मात्र ज्या बैल जोड्या खरेदी केलेल्या आहेत. त्या बैल जोड्या रथासाठी सक्षम आहेत किंवा नाही याची खात्तरजमा वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करून घेतली आहे. त्याच प्रमाणे त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली ( Dehugaon )आहे.