मावळ ऑनलाईन – देहूगाव येलवाडी फाटा या रस्त्याची ( Dehugaon Road) अदुरुस्तीनंतर अवघ्या एकच महिन्यात झाली पुन्हा चाळण झाल्याने वाहन चालकांना व नागरिकांसह भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच प्रमाणे दुचाकी वाहन चालक व पायी चालणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त करीत आहेत. या बाबत येलवाडीचे माजी सरपंच नितीन गाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर तीव्र शब्दात नारीजा व्यक्त केली आहे.
Dehugaon: प्रलंबीत मागण्यासाठी देहू ते आळंदी दिव्यांगांनी काढली दुचाकी रॅली
मागील महिन्यात पालखी प्रस्थान सोहळ्या पुर्वी झालेल्या पावसातच या रस्त्याची दुरावस्था झाली होती. पालखी प्रस्थान सोहळा असल्याने सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने तातडीने दखल घेऊन हा रस्ता जेसीबीच्या मदतीने समतल करण्यात आला होता व रस्त्याचे खड्डे खडी व मुरूमाने भरले होते.
मात्र त्यानंतर अवघ्या महिनाभरातच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने तळगाव चाकण औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठीचा पिंपरी चिंचवड करांना जवळचा मार्ग आहे. या रस्त्याची पावसाने पडलेले खड्डे व झालेली चाळण यामुळे चारचाकी वाहन चालक, दुचाकीस्वार आणि नागरिक व भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी तारांबळ उडत आहे. रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले असल्याने वाहनांचे मोठे नुकसानही होत असून लहान मोठे अपघातही घडत( Dehugaon Road) अ आहे.
Dehugaon: प्रलंबीत मागण्यासाठी देहू ते आळंदी दिव्यांगांनी काढली दुचाकी रॅली
यामुळे परिसरातील वाहन चालक व नागरिक त्रस्त झाले असून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत आहेत. या बाबत येलवाडी गावचे माजी सरपंच नितीन गाडे यांनी आंदोलन करमार असल्या संदर्भात महिन्यापुर्वी इशारा दिला होता. त्यामुळे रस्त्याचे खड्डे बुजविले होते. मात्र महिन्यातच दुरावस्था झाल्याने त्यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले ( Dehugaon Road) असून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.