मावळ ऑनलाईन – शासन दरबारी दिव्यांगांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारी (दि.७ ) सकाळी ११ वाजता दिव्यांगानी देहू ते आळंदी दुचाकी रॅली काढली.
आमदार कडू यांच्या नेतृत्वात अमरावती ते यवतमाळ प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदयात्रा सोमवारी प्रारंभ केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर व देहू आणि आळंदी परीसरातील दिव्यांगांनी तीर्थक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या महाद्वारातून दुचाकी रॅलीची सुरुवात केली.
Python : कोंबड्यांच्या खुराड्यात आढळला भला मोठा अजगर
Mahatma Gandhi statue : पुण्यात एका तरुणाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धभिषेक

ही रॅली तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, डुडूळगाव मार्गे आळंदी येथे गेली. आळंदी येथे या दिव्यांग रॅलीची सांगता होणार आहे. पिंपरी चिंचवड प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, महिला अध्यक्षा संगीता जोशी, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र कांबळे, रमेश तांबे, रमेश पिसे, सज्जू धोंडफोडे यांसह सुमारे अडीचशे दिव्यांग रॅलीत या सहभागी झाले होते.