situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehu Road Railway Station : देहूरोड रेल्वे स्थानकावर सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रवासी संघाच्या अध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On:
Dehu Road Railway Station

मावळ ऑनलाईन –  कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी देहूरोड रेल्वे प्रवासी संघाच्यावतीने शुक्रवारी देहूरोड रेल्वे स्थानकावर (Dehu Road Railway Station)तीव्र आंदोलन करण्यात आले.

 आंदोलनादरम्यान, संघाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी महिलेच्या वेशात येऊन चालत्या रेल्वेसमोर आत्मदहन करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.या घटनेने क्षणभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी सतर्कता दाखवत प्रकार हाताळल्या मुळे आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता टळली.

Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी

या आंदोलनात रघु गव्हाळे, भाजप नेते सूर्यकांत सुर्वे, जलाल शेख, अजय बरवारिया, नंदू शेजुळे, सुलतान शेख, सुभाष म्हस्के, अनिल खंडेलवाल आदी कार्यकर्ते सहभागी होते.

प्रवासी संघाचे म्हणणे आहे की, गेल्या तीन वर्षांपासून देहूरोड स्थानकावर थांबणारी सह्याद्री एक्सप्रेस अचानक बंद करण्यात आली आहे. ही गाडी गोरगरीब प्रवाशांसाठी अत्यंत आवश्यक असल्याने ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अन्यथा पर्यायी गाडीला देहूरोड (Dehu Road Railway Station) येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघाने केली आहे.

Pune Terrorist Case : पुण्यातील घातपात प्रकरणातील संशयित दहशतवाद्याला अटक

धर्मपाल तंतरपाळे म्हणाले, “रेल्वे प्रशासनाकडून केवळ प्रस्ताव पाठवले जातात, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. आम्ही याआधीही निवेदने दिली, आंदोलनं केली, पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच आज आत्मदहनाचा कठोर निर्णय घ्यावा लागला.”

मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा प्रवासी संघाच्यावतीने करण्यात देण्यात आला (Dehu Road Railway Station) आहे.

Follow Us On