मावळ ऑनलाईन –देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने दसरा व दिवाळी उत्सवाच्या (Dehu Road)पार्श्वभूमीवर प्रथमच विद्युत रोषणाईने बाजारपेठ सजविण्यात आले आहे. बाजारपेठेतील आगळे वेगळे आकर्षक विद्युत रोषणाईने पंचक्रोशीतील ग्राहक आकर्षित होत आहे.
या विद्युत रोषणाईचे उद्घाटन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.असोसिएशनचे अध्यक्ष आशिष बंसल,संजय पारेख,अमोल व्यवहारे,राजू पंडित,सूर्यकांत सुर्वे,माजी नगरसेवक विशाल खंडेलवाल,मदन सोनीगरा,महावीर बरलोटा,राजेश बन्सल,राजू नाकोडा,किशोर पालरेचा नीरज गुंदेशा,कांतीलाल पारेख यासह व्यापारीं बांधव आदी यावेळी उपस्थित होते.
Talegaon Dabhade-आईच्या कवितांनी भारावले विद्यार्थी; ‘इंद्रायणी’त अभिजात मराठी भाषा गौरव दिन संपन्न
Talegaon Dabhade: नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीत ‘अविष्कार २०२५’ पोस्टर स्पर्धा संपन्न

देहूरोड बाजारपेठ ही ब्रिटिश कालीन असून पंचक्रोशीच्या गावातील ग्राहकांची मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेली आहे. खाद्यपदार्थ, हॉटेल ,स्वीट्स,किराणा, कपडे,इलेक्ट्रॉनिक व घरगुती साहित्य, भांडी,स्टेशनरी – कटलरी,मोबाईल शॉपी,गिरण्या अशा सर्व प्रकारच्या साहित्यांची दुकानांसह सोन्या -चांदीची ही मोठी बाजारपेठ आहे बाजारपेठेमध्ये घाऊक व किरकोळ विक्रेत्यांची व्यापारी ही मोठ्या प्रमाणात आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांच्या मोठी भाजी मंडई देखील बाजारपेठेमध्ये आहे .बाजारपेठे लगतच मुंबई पुणे महामार्ग,रेल्वे स्थानक व येण्या-जाण्यासाठी वाहनांच्या विविध सुविधा असल्याने गजबजलेल्या या बाजारपेठेमध्ये पंचक्रोशीतील ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते.
दसरा व दिवाळी निमित्त ग्राहकांसाठी विविध दुकानातून सवलती ,सूट ,बक्षिसांसह विविध योजना सुरू आहे. व्यापारी असोसिएशनच्या वतीने यंदा प्रथमच संपूर्ण बाजारपेठ विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे आकर्षक बनले असून बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे . व्यापाऱ वृद्धिगंत व्हावे यासाठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने नवनवे योजना आखत असून यंदा प्रथमच केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईसाठी परिश्रम घेतले आहे.