मावळ ऑनलाईन –जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहूगाव येथील विठ्ठल रुक्मिनी व श्री संत तुकाराम महाराजांचे आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी भर पावसात देऊळवाड्यात मोठी गर्दी केली होती.
सकाळी पासुनच देहू परिसरात पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाविकांनी छत्र्यांच्या आधार घेत दर्शन घेतले. दुपारनंतर भाविकांची मोठी गर्दी झाल्याने पालखी मार्गावर जलधारा अंगावर घेत छत्रीचा आधार घेत भाविकांची लाबच लाब दर्शनासाठी रांग लागली होती.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नुकताच पंढरपूरात विसावला असून आषाढी एकादशी निमित्त पायीवारी पालखी सोहळा व त्यासमवेत गेली १९ दिवस राज्यातील विविध भागातून विविध संतांच्या पालखी सोबत लाखो भाविक पायी चालत पोहचले आहेत. लाखो भाविक वारकऱ्यांनी पांडूरंगाचे दर्शन घेऊन तर काही वारकऱ्यांनी पांडूरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
Vadgaon:वडगाव शहर भाजयुमो अध्यक्ष आतिश ढोरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
ज्या भाविकांना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही अशा भाविकांनी, देहूगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी देखील येथील देऊळवाड्यात जाऊन पांडूरंगाच्या मंदिरात व श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र देहूगाव येथील विठ्ठल रुक्मिनी मंदिरात व श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराला, राममंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी पहाटे पासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
हा भाविकांचा उत्साह आणि गर्दी पाऊसातही कायम होता. सकाळ पासुन दर्शन बारी ही पालखी मार्गावरील बाजार आळी पर्यंत गेली होती. दुपारी ही गर्दी हळूहळू वाढतच गेली. पहाटे चार वाजता संस्थानचे मुख्य पूजारी धनंजय मोरे यांच्या हस्ते महापूजा व काकड आरती करण्यात आली. पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिरातील नैमित्तिक विधीवत महापूजा केली. महापूजा उरकल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. आल्हाददायक व भक्तीमय वातावरणात भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. गर्दी पाहता संस्थानच्या वतीने भाविकांच्या दर्शनाच्या रांगा ह्या दर्शनबारीतून लावण्यात आली होती. दर्शनहबारीवर पत्रा शेड असल्याने पाऊस पडत असूनही भाविकांना दर्शन घेण्यासाठी कोणतीही अडचण झाली नाही.
मावळ परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने इंद्रायणी नदी वाहात आहे. भाविक घाटावर जाऊन हात पाय धुवून व आंघोळ करून मंदिरात येत होते. दुपार नंतर स्थानिक भाविकांनीही मोठी गर्दी केली होती त्याच प्रमाणे जे भाविक थेट पंढरपूरच्या वारीला दाखल झाले होते त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरवात करण्या पुर्वी देहू व आळंदी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंदिरा व परिसरात भाविकांच्या गर्दीचा विचार करता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र चौदा टाळकरी कमान परिसरात वाहने लावल्याने भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी अडचण जाणवत होती. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर भाविकांनी दुतर्फा वाहने लावल्याने रस्त्याने जाणे अवघड झाले होते. गावात सक्षम पार्किंगची व्यवस्था नसल्याने काही वाहने नदी पात्रातील घाटावर वाहने लावली होती. मात्र पावसाचे पाणी वाढले तर मात्र मोठा अनर्थ होवू शकतो. याकडे पार्किंग ठेकेदाराने दु्र्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
Alandi :देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

