मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे येथे प्रकाश,उत्साह आणि सुमधुर सुरांच्या संगमाने सजलेली ‘दीपसंध्या’ संगीत मैफिल रंगणार आहे. ‘झी मराठी सा रे ग म प’ फेम लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन हे श्रवणीय गाण्यांची मैफल सादर करणार आहेत.
या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक निखिलभाऊ भगत यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे मराठी तसेच हिंदीतील लोकप्रिय गीते सादर करणार आहेत.ही ‘दीपसंध्या’ संगीत मैफल शुक्रवार दि२४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता, गोळवलकर गुरुजी क्रीडांगण (गोल मैदान), यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आली आहे.
Talegaon: तळेगाव ग्रामीण व गणपती मळा येथे प्रशांत दादा भागवत व मेघाताईंच्या उपस्थितीत साजरी झाली भाऊबीज; प्रेम, स्नेह आणि विकासाचा दीप पेटला!
Mulshi: काम करण्यास नकार दिल्याने पेंटरला मारहाण
प्रकाश आणि संगीताचा हा सुरेल संगम तळेगाव शहर व परिसरातील संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी आणि संगीतरसिकांनी या भव्य ‘दीपसंध्या’ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुमधुर गाण्यांचा आनंद घ्यावा, असे निखिलभाऊ भगत यांनी आवाहन केले आहे.



















