मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील जांभूळ गावातील ( Crime News ) सनराईस हॉटेल मध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात दोन वेटरनी ग्राहकावर आणि त्याच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञात वेटरविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना सोमवारी ( 6ऑक्टोबर) रात्री साडेनऊ वाजता जांभुळ गाव ( Crime News ) हद्दीतील जुने मुंबई–पुणे लेन लगत असलेल्या सनराईज हॉटेलमध्ये घडली. फिर्यादी सदानंद संजु चौधरी (वय ५०, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गावठाण, कामशेत, ता. मावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हॉटेलच्या काऊंटरसमोर जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून वाद झाला.
वाद वाढल्याने आरोपींपैकी एक वेटर (नाव व पत्ता माहीत नाही) याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या हातावर आणि पाठीवर वार केले. त्याचप्रमाणे त्याच्या मुलगा अभिषेक सदानंद चौधरी याच्या तोंडावरही मारहाण करण्यात आली. या दरम्यान दोन्ही वेटरनी शिवीगाळ व दमदाटी करत आपखुशीने दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद आहे. या वरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Crime News ) आहेत.