मावळ ऑनलाईन – हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणातून चौघांनी ( Crime News)तरुणाला बेदम मारहाण केली आहे ही घटना मावळातील कुनेगाव येथे बुधवारी (दि.13) दुपारी घडली.
याप्रकरणी वीस वर्षीय महिलेने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद ( Crime News)दिली आहे. गणपत लक्ष्मण जोरी रोहन गणपत जोरी दिनेश गणपत जोरी, आदिव्य सुभाष भिलारे (सर्व राहणार कुनेगाव मावळ). यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती विशाल नामदेव असवले( Crime News) हे रक्षाबंधनासाठी फिर्यादी यांच्या माहेरी कुनेगाव येथे गेले होते. यावेळी रस्त्यात दुचाकी लावलेली होती. फिर्यादी यांच्या पतीने ती दुचाकी काढण्यासाठी हॉर्न वाजवले.
या कारणावरून आरोपी व फिर्यादीचे पती यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांच्या पतीचा मित्र अमित लक्ष्मण शिवेकर हे तिथे आले असता आरोपींनी दोघांनाही लाथा बुक्क्यांनी व लोखंडी फावड्याने बेदम मारहाण करत दोघांनाही गंभीर जखमी केले. यावरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Crime News) आहेत.