तिघांना अटकण्याने अडीच कोटींची फसवणूक
Team MyPuneCity –सांगवी येथील एका ज्येष्ठ व्यक्तीला सोशल मीडियावरून ( Crime News) संपर्क करत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर केलेली गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी आणखी पैसे घेत ज्येष्ठ व्यक्तीची दोन कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बाळासाहेब सखाराम चौरे (बीड), अमोल पाटील (सांगली), युनूस दिलावर चौगुले (सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी ( Crime News) येथील एका ज्येष्ठ व्यक्तीला अनोळखी लोकांनी सोशल मीडियावरून संपर्क केला. त्यांना एचएसबीसी ट्रेडिंग नावाचे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. या एप द्वारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एप मध्ये फिर्यादी व्यक्तीला चांगला फायदा झाला असल्याची खोटी माहिती दाखवण्यात आली. काही कालावधीनंतर फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ब्रोकरेज फी, हाय ट्रॅनजेक्शन फी, सिक्युरिटी डिपॉझिज, थर्ड पार्टी हाय ट्रॅन्जेक्शन विड्रॉअल प्लॅटफॉर्म असे वेगवेगळे चार्जेस मागितले. फिर्यादी यांनी आरोपींना एकूण दोन कोटी ५२ लाख ९६ हजार ४०६ रुपये पाठवले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सायबर पोलिसांनी सुरुवातीला बाळासाहेब चौरे याला अटक केली. त्याने दुबई येथे जाऊन गणेश काळे, पाकिस्तानी नागरिक नोमन या दोघांना अकाउंट देऊन युएसडीटी या क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे घेतले होते. हे पैसे वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर झाले होते. त्यामुळे त्या बँक खात्यांची माहिती पोलिसांनी काढली असता सांगली येथील अमोल पाटील याच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अमोल पाटील आणि त्याचा साथीदार युनूस चौगुले या दोघांना अटक केली. पाटील आणि चौगुले यांनी मध्य प्रदेश येथे जाऊन त्यांच्या काही साथीदारांसोबत बँक खाते चालवले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती मिळाली असून त्या खात्यांवर देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये तक्रारी दाखल झालेल्या असल्याचे समोर आले ( Crime News) आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, विद्या पाटील, प्रकाश कातकडे, पोलीस कर्मचारी कबुले, विशाल निचीत, भालेराव, अतुल लोखंडे, दीपक भोसले, नितेश बच्चेवार, स्वप्नील खणसे, सुरज शिंदे, निलेश देशमुख, दीपाली चव्हाण, सपना सांगळे, सरिता तुपे यांनी ( Crime News) केली.