Team MyPuneCity – भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने वाकड येथील एका डॉक्टरची ३० लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २०१९ ते मे २०२५ या कालावधीत वाकड आणि धायरी येथे ( Crime News) घडली.
Bhosari Crime News : बनावट कागदपत्रे आणि बोगस जमीनदार न्यायालयात उभे करून तीन बांगलादेशींना जामीन
डॉ. अमितकुमार शालिग्राम पाटील (४६, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निशांत जगदीश व्यास (३७, नांदेड सिटी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Talegaon Dabhade : गुलाब शिंदे यांची फार्मास्युटिकल सायन्स विषयात पीएचडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निशांत याने डॉ. पाटील यांना स्टेमसेलमध्ये रिसर्च करून त्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करू, असे आमिष दाखवले. वेगवेगळ्या ठिकाणावरून ऑर्डर मिळाली असल्याचे सांगत तसेच इतर कारणांसाठी पाटील यांच्याकडून ३० लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत ( Crime News) आहेत.