मावळ ऑनलाईन – मागील भांडणाच्या रागातून ( Crime News) बेकायदेशीर जमाव जमवून एका टोळक्याने एका व्यक्तीच्या इनोव्हा गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या आणि त्यांना जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.28 ऑगस्ट) दुपारी इंदोरी गावात घडली.
Kharadi Crime News : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; धमकावून दोन लाख रुपये उकळले
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय मोघे (56) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ( Crime News) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चेतन येवले (कान्हेवाडी) आणि इतर 6 ते 7 अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोटारसायकलवरून दत्तु खंडु ढोरे यांच्या घरासमोर आले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात दगड घेतले आणि आरडाओरडा करून शिवीगाळ केली. मागील भांडणाच्या रागातून त्यांनी दत्तु ढोरे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या इनोव्हा गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. दगडफेकीत दत्तु ढोरे हे जखमी झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत ( Crime News) आहेत.