Team MyPuneCity –तुमच्या वीटभट्टीच्या धुराचा आम्हाला त्रास (Crime News) होत आहे, असे म्हणत शिवीगाळ करून दोन जणांनी येथील कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २७) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माणगाव येथे घडली.
Thergaon Crime News : ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी रोडने मारहाण
नवनाथ कैलास मोरे (वय 20, रा. मुलाणी वस्ती, माणगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे जखमी झालेल्या वीटभट्टी कामगाराचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि 29) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शंकर बाबुराव पारखी (वय 55) आणि दत्ता शंकर पारखी (वय 25, दोघेही रा. पारखी वस्ती, माणगाव, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
Kamshet news : कामशेत ग्रामस्थांकडून शासकीय जागेच्या मोजणीला विरोध; अधिकाऱ्यांना घेराव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराबाहेर काही लोक आरडाओरडा करत शिवीगाळ करत होते. ते पाहण्यासाठी फिर्यादी घराबाहेर गेले त्यावेळी आरोपींनी त्यांना जवळ बोलून तुमच्या मालकाच्या वीटभट्टीच्या धुराचा त्रास आम्हाला होतो, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी शंकर पारखी याने त्याच्या जवळील लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत (Crime News) आहेत.