Team MyPuneCity –पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी (२ मे) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मोशी येथे अपघात झाला. भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
सुनील आनंदा साळवे (२७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रवींद्र परशुराम लव्हाळे (४५) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सुनील यांचे नातेवाईक शांताराम सोनोने (२३, मुंढवा) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच १४/जीके ८९११) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Indrayani River: इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचे आंदोलन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र लव्हाळे आणि सुनील साळवे हे शुक्रवारी रात्री हिंजवडी येथून बुलढाणा येथे दुचाकीवरून जात होते. पुणे-नाशिक महामार्गाने जात असताना मोशी येथे त्यांच्या दुचाकीला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. या अपघातात रवींद्र हे जखमी झाले. तर सुनील साळवे यांचा मृत्यू झाला.