situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad temperature : चिंचवडचे तापमान ४१.१ अंश सेल्सिअसवर : पुण्यात उकाड्याचा कडेलोट, पुरंदर पुन्हा सर्वात तापते

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –  पुणे जिल्ह्यात उन्हाळ्याचा कहर वाढत असून, (Chinchwad temperature)आज चिंचवडमध्ये कमाल तापमान ४१.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ४० अंशांच्या पुढे तापमान गेल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

पुरंदर तालुक्यातील तापमान पुन्हा एकदा सर्वाधिक नोंदले गेले असून ते तब्बल ४२.२ अंश सेल्सिअस इतके पोहोचले. कोरेगाव पार्क आणि डुडुळगाव येथे अनुक्रमे ४१.९ अंश, तर शिवाजीनगर आणि पाषाणमध्ये ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली.

तळेगाव ढमढेरे (४१.४), राजगुरुनगर (४१.७), हडपसर (४०.८), बारामती (४०.६), वडगाव शेरी (४०.३) आणि मगरपट्टा (४०.१) या भागातही तापमानाने ४० अंशांची पातळी ओलांडली.

दुसरीकडे, लवासा (३६.४), कुरवंडे (३६.१), निमगिरी (३७.०) आणि माळीण (३७.४) यांसारख्या डोंगराळ भागात तुलनेने थोडेसे सौम्य तापमान नोंदले गेले.

सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून, दुपारी उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढते आहे. रस्त्यांवर वर्दळ कमी जाणवते आहे आणि नागरिक सावलीच्या आणि थंड जागांचा शोध घेताना दिसत आहेत.

हवामान खात्याने पुढील काही दिवस उन्हाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://youtu.be/AwU80BMOQnY?si=uOced68scXG6Smoi

Follow Us On

Also Read