मावळ ऑनलाईन –चाकण येथील कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसने एसटी बसला पाठीमागून धडक (Bus Accident) दिली या अपघातात खाजगी बसमधील 11 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (16 जुलै) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन खाजगी बस देहू फाटा येथून जात होती. दरम्यान परळ डेपोच्या एसटी बसला खाजगी बसने पाठीमागून धडक (Bus Accident) दिली. या अपघातात खाजगी बस मधील 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांना अथर्व हॉस्पिटल, पाच जणांना संत तुकाराम महाराज हॉस्पिटल देहू आणि एकाला जनरल हॉस्पिटल तळेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडे चालते बोलते विद्यापीठ -प्राचार्य डॉ. संभाजी मलघे
Chakan Crime News : शेलपिंपळगावमध्ये दरोडा; ५ लाखांचा ऐवज लंपास


बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच एसटी बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.