मावळ ऑनलाईन – भारतीय सेनेचे केंद्रीय आयुध भंडार (सीओडी) देहूरोड डेपोचा (C O D Dehu Road Depot) 83 वा स्थापना दिवस डेपोतील सर्व अधिकारी व कामगारांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सीओडी देहूरोडचे कमांडंट ब्रिगेडियर विकांत गंभीर (C O D Dehu Road Depot)यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात ते म्हणाले, “स्थापनेपासून आजपर्यंत डेपोने अनेक परिवर्तन अनुभवले आणि घडवून आणले आहे. भारतीय सेनेत आपल्या डेपोला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. युद्धकाळात किंवा आपत्कालीन परिस्थितीत हा डेपो नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. पुढेही आपण सर्वांनी जलदगतीने व समर्पणाने कार्य करणे आवश्यक आहे.”

Rashi Bhavishya 2 Oct 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
ब्रिगेडियर गंभीर यांनी डेपोच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व कमांडंट(C O D Dehu Road Depot) अधिकारी, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले आणि सेनेसोबत खांद्याला खांदा लावून कार्य करण्याचे आवाहन केले.
आरोग्य व रक्तदान शिबीर
स्थापना दिनानिमित्त जहांगीर रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सेनेतील अधिकारी, जवान तसेच कामगारांनी उत्साहाने सहभाग (C O D Dehu Road Depot)घेतला.डाॅ. तुषार धमाळे,डाॅ. अनिल कुमार, रक्तदान व्यवस्थापक मनिषा जगताप आणि संपूर्ण मेडिकल टीमने शिबिराचे आयोजन केले. कामगारांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले आणि अनेकांनी याचा लाभ घेतला.
आयोजन व सन्मान
कार्यक्रमाचे आयोजन प्रशासन व डेपो वर्क्स कमिटीच्या वतीने करण्यात आले. वर्क्स कमिटीचे चेअरमन विक्रम टकले, सेक्रेटरी प्रमोद मलगेकर तसेच बृजमोहन सिंग, राहुल बुरडे व एकनाथ टिळेकर यांनी संपूर्ण व्यवस्थापन केले.या प्रसंगी सर्व कामगारांसाठी बडाखान्याचे आयोजन करण्यात आले. तसेच डेपोतील सैनिक व असैनिक उत्कृष्ट कामगारांना गौरविण्यात (C O D Dehu Road Depot) आले.