मावळ ऑनलाईन – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई च्या दिशेने (Borghat Accident)जाणाऱ्या लेनवर नव्या बोगद्या जवळआज (शनिवारी) दुपारी 2 वाजता झाला आहे. या अपघातात तब्बल 10 ते 12 वाहनांची एकमेकांना धडक बसली आहे.
या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर 16 जण जखमी झाले आहेत. हा अपघात कंटेनर चे ब्रेक झाल्याने झाल्याचे बोलले जात आहे.
खोपोली फूड मॉल ते नवीन बोगदा अशी वाहने पसरली आहेत. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातामुळे तीन ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळी काम करत आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका, ‘देवदूत’ यंत्रणा आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तातडीने दाखल झाले आहेत.
Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; भक्ती सोपान पुलावरून पाणी
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन

अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालय आणि काही खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.