मावळ ऑनलाईन –देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या ( BJP Vision-2030) वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपा व्हिजन २०३० जनसंपर्क अभियान राबविणार आहे.यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरीकांच्या सूचना स्विकारण्यात येणार असून नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात या सूचनांचा समावेश केला जाणार आहे.
वडगाव नगरपंचायतीची पहिली निवडणूक २०१८ मध्ये झाली.या निवडणुकीत ( BJP Vision-2030) भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर ७ उमेदवार विजयी झाले होते.यावेळी नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदासह भाजपाचे संख्याबळ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असून त्यादृष्टीने शहर भाजपाने काम चालू केले आहे.
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती
व्हिजन २०३० जनसंपर्क अभियानात शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरात जाणार असून नागरीकांना एका फॉर्मवर प्रश्नावली देणार आहेत. ( BJP Vision-2030) ज्यामध्ये त्यांच्या परीसरातील नागरी सुविधा, नगरपंचायत कार्यालयाच्या सेवा,कर आकारणी, प्रस्तावित विकास आराखडा (DP)याबाबत वस्तूनिष्ठ पर्यायी प्रश्न विचारण्यात आले असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरीकांच्या ज्या काही सूचना असतील त्या लिहीण्यासाठी फॉर्ममध्ये जागा ठेवण्यात आली आहे.
Rashi Bhavishya 16 SEPT 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरव्या वाढदिवशी १७ सप्टेंबर पासून या अभियानाला सुरुवात होईल अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी ( BJP Vision-2030) दिली.