वकिलासह बोगस जमीनदारांवर गुन्हा दाखल
Team MyPuneCity – भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुष बांगलादेशीला अटक केली. त्या तिघांचा जामीन मिळवण्यासाठी वकिलाने बोगस जमीनदार, बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर केली. तीन बांगलादेशी नागरिकांना जामीन मिळाल्यानंतर ते न्यायालयात हजर राहिले नसल्याने हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना ४ एप्रिल ते १मे या कालावधीत (Bhosari Crime News)घडली.
Pimpri News : कामगार ,श्रमिकांची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबावे– यशवंतभाऊ भोसले
सम्राट बलाय बाला (२३) आणि दोन महिला (बो-हाडेवाडी, मोशी, पुणे. मूळ रा. बहादुरपुर, पो. दतोकन्दवा जि. मदारीपुर बांगलादेश), तसेच त्या तिघांचा जामीन करणारे वकील, बोगस जामीनदार, बनावट कागदपत्रे तयार करणारे आणि जामीन होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार दत्तात्रय निकम यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Bhosari Crime News) आहे.
Talegaon Dabhade : गुलाब शिंदे यांची फार्मास्युटिकल सायन्स विषयात पीएचडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बो-हाडेवाडी मोशी येथील सहयाद्री बांधकाम साईट, लेबर कॅम्पमधून एप्रिल २०२४ मध्ये तीन बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करत असल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. त्या तिघांना पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, बांगलादेशी नागरिकांनी त्यांच्या जामीनासाठी एका वकिलाच्या मार्फत खोटे जामीनदार न्यायालयात उभे केले. तसेच बांगलादेशी नागरिकांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळवला. मात्र त्यानंतर ते न्यायालयात हजर राहिले नाहीत. तसेच आरोपींनी दिलेल्या पत्त्यावर देखील ते आढळून येत नसल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत (Bhosari Crime News) आहेत.