मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून यांत्रिक पद्धतीने भात शेती (Bhat Sheti) करण्याकडे कल वाढला असून त्यादृष्टीने सुधारित पद्धतीने भात लागवडी करण्यास सुरुवात झाली आहे.
Khandala Ghat Accident : खंडाळा घाटात ट्रकमधून पडलेल्या पाईपमुळे दोन महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी
सध्या मावळ तालुक्यात जोरदार मान्सूनचा पाऊस पडत असून या पावसामुळे सर्वत्र भात खरीप पिकांच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर चालू झालेल्या आहेत. सर्वत्र गावोगावी सध्या शेतकरी बांधवांकडून भात लावणीचीच कामे केली जात आहेत.
Pune:हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्याला अध्यात्मिक साधनेची जोड हवी – दादा वेदक
मावळ तालुका हा भात पिकामध्ये अग्रेसर असलेला तालुका असून या तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. या पिकासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी जागृती राज्य शासनाच्या कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग विशेष प्रयत्नशील आहेत.
मावळ तालुक्यातील खरीप भात पीकाच्या लागवडीसाठी अलीकडील काळात शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत.(Bhat Sheti)
१) चार सूत्री भात लागवड पद्धत
२) एस आर टी भात लागवड पद्धत
३) आधुनिक भात लावणी यंत्राने भात लागवड
४) पेरणी पद्धतीने भात लागवड
अशा आधुनिक पद्धतीचा वापर शेतकरी करू लागले आहे असे सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले.
या पद्धतीने भातलागवडी अलीकडच्या काळात शेतकऱ्याकडून केल्या जात आहेतभात लागवडी करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन खर्च आणि अधिक उत्पादन अशा दोन्ही गोष्टी साध्य होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा होऊ शकतो असे प्रगतीशील शेतकरी गणपत भानुसघरे व प्रवीण शिंदे यांनी (Bhat Sheti) सांगितले.