मावळ ऑनलाईन –टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,खडकी (Bhandara Dongar) यांच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे वाङ्मय मंडळाच्या नव्या पर्वाची सुरुवात संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या प्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थे, काशिनाथ देवधर,प्राचार्य डॉ.संजय चाकणे, मराठी विभागप्रमुख प्रा. महादेव रोकडे, हिंदी विभागप्रमुख डॉ. अविनाश कोल्हे (Bhandara Dongar) तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. मोरे म्हणाले, “संत तुकाराम महाराजांनी या भंडारा डोंगरावर अनेक अभंगांची रचना केली. येथे वृक्ष, प्राणी, आणि अगदी पाषाणसुद्धा(Bhandara Dongar) तुकोबांचे सोयरे झाले होते. संत माणसासारखे दिसतात, पण त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा अखंड झरा वाहत असतो. तिथे द्वेष, मत्सर, भेदभाव यांना स्थान नसते.”
Golden Rotary : गोल्डन रोटरीचे भव्य मोफत आरोग्य शिबिर
त्यांनी पुढे सांगितले की, “लहान वयाच्या संत मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना आत्मजाणिव करून देऊन ताटी उघडण्यास भाग पाडले – हीच संतपरंपरेची थोरवी आहे. अशा संतांचे (Bhandara Dongar) साहित्य केवळ वाचण्याचे नाही, तर जगण्याचे मार्गदर्शन करणारे आहे.”

कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते. अशाच उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. चाकोरीबाहेरील शिक्षणामुळे विद्यार्थी विचार करायला शिकतो, लिहायला लागतो आणि त्यांच्यात समाजाभिमुख जाणिवाही निर्माण(Bhandara Dongar) होते.”
डॉ. मोरे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना केवळ साहित्याची नव्हे, तर जीवनमूल्यांची जाणीव झाली. “तुम्ही येथे तुकोबांचे अभंग वाचाल, आणि कदाचित एखादं काव्य तुमच्या मनातही जन्म घेईल,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना सृजनशीलतेसाठी प्रेरणा दिली.महाविद्यालयाच्या वतीने आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला (Bhandara Dongar) आहे.
यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा. महादेव रोकडे, हिंदी विभागप्रमुख डॉ. अविनाश कोल्हे तसेच डॉ. शैलेंद्र काळे, डॉ. कविता चव्हाण, प्रा. सारिका मुंदडा, प्रा. स्वामीराज भिसे यांनी विशेष श्रम (Bhandara Dongar) घेतले.