रोटरी सिटीतर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांना स्टडी ॲप वाटप समारंभ.
मावळ ऑनलाईन –रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आयोजित (Bhagwan Shinde)नवीन समर्थ विद्यालय या राष्ट्रीय शाळेतील इयत्ता १० वीतील १३० विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲप समारंभपूर्वक देण्यात आला. विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवीन व जुन्या अध्ययन पद्धतीची सांगड घालून अभ्यास करावा व गुणवत्ता यादीमध्ये येऊन खूप मोठं व्हावं असे प्रतिपादन रोटरी सिटी चे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व रोटरीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
संगणक युगात अध्ययन पद्धती साठी मोबाईलचा वापर कसा करावा, स्टडी ॲप माध्यमातून मराठी व इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमाची मांडणी विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे असे प्रतिपादन रोटरी सिटीच्या डायरेक्टर व प्रकल्प प्रमुख दिपाली पाटील यांनी करताना ॲपचा वापर कसा करावा व येणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या याविषयी विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून परिपूर्ण मार्गदर्शन केले.प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करताना दिपाली पाटील यांनी एस.एस.सी. परीक्षेत स्टडी ॲपचा उपयोग विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
Nana Peth Crime News : कोमकरचा खून प्रकरणी बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा
Jambhavede: गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!


राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व कालखंडात लोकमान्य टिळक व अण्णासाहेब विजापूरकर यांनी सुरू केलेल्या समर्थ विद्यालय या प्रशालेला एक ऐतिहासिक वारसा असून आपण भाग्यवान आहोत की या शाळेचे विद्यार्थी आहोत. आजच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान युक्त अभ्यासक्रम अत्याधुनिक पद्धतीने करण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत त्यानुसार स्टडी ॲपचे रोटरी सिटीतर्फे वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून नाव कामवावं असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी व सह प्रकल्प प्रमुख दिनेश निलकंठ यांनी करताना शाळेविषयी आदरभाव व्यक्त केला व रोटरी सिटीच्या विविधांगी उपक्रमांची प्रास्ताविकाद्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली.माजी नगरसेविका रो.मनिषा पारखे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह प्रकल्प प्रमुख दिनेश निळकंठ यांनी केले सूत्रसंचालन अध्यापक दिलीप पोटे यांनी तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे यांनी आभार मानले.
संग्राम जगताप, अभिनेते मोहन खांबेटे, दिपाली पाटील, दिनेश निळकंठ, आनंदराव रिकामे, रघुनाथ कश्यप,वर्षा खारगे,मनीषा पारखे,वैशाली लगाडे इ.सह शाळेचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.