मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यात भाद्रपदी बैलपोळा ( Bhadrapad Bailpola) साजरा केला जातो. रविवारी (२१ सप्टेंबर) हा बैलपोळा मावळ तालुक्यातील बळीराजाने अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला. तालुक्यातील सर्व गावांमध्ये बळीराजाने आपल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली. बैलांची पूजा करून त्याला गोड नैवेद्य दिला.
Yerawada Suicide News : येरवड्यात पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
शेतकरी राजाने सकाळीच आपल्या बैलांना आंघोळी घालून ( Bhadrapad Bailpola) त्यांची रंगरंगोटी करून त्यांच्या शिंगांना बेगड, हिंगोळ लावून तसेच त्यांच्या पाठीवर रंगाने चित्र काढून सजावट केली. काहींनी बैलांच्या अंगावर झुली घातल्या होत्या. तर शिंगांना बाशिंगे बांधली होती. फुगे, नारळ, फुलांचे हार घालून बैलांना सजवण्यात आले होते.
Rashi Bhavishya 22 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
बळीराजाने आपल्या बैलांना रानातून गावातील वेशीवर आणून( Bhadrapad Bailpola) मिरवणुकीने मारुतीच्या मंदिरासमोर बैलांची पूजा करून नारळ वाढवला. काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावातून वाजत गाजत ढोल ताशाच्या तालावर ढोली बाजाच्या माध्यमातून व डीजेच्या तालावर मिरवणूका काढल्या. रात्री उशिरापर्यंत काहीजणांनी अतिशय आनंदाने या मिरवणुका काढून बैलांना आपल्या घरी आणले. त्या ठिकाणी गृहलक्ष्मीने त्यांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला घातला.
दिवसभर शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय विशेष आनंदी होते.( Bhadrapad Bailpola) यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने भातपीक चांगले आले आहे. यामुळे जनावरांचा चारही मुबलक तयार झाला आहे. शेतकऱ्यांचे बैल अतिशय धष्टपुष्ट असून शेतकरी देखील अतिशय आनंदात आहेत.
बैलांच्या शिंगांमधून बक्षीस मिळवण्याची प्रथा
मावळ तालुक्यात बैलांच्या शिंगांमधून बक्षीस मिळवण्याची प्रथा आहे. या प्रथेला अनेकजण खेळ म्हणून खेळतात. गावातील अत्यंत चपळ आणि तरबेज ( Bhadrapad Bailpola) बैलाच्या शिंगांना नारळ, बक्षीस बांधले जाते. बैलाला गावाच्या वेशीतून सोडले जाते. बैलाने वेस ओलांडली की, गावातील नागरिक त्या बैलाचा पाठलाग करतात आणि त्याच्या शिंगाला बांधलेला मानाचा नारळ अथवा बक्षीस काढून घेतात. हे बक्षीस मिळवण्यासाठी अनेक ग्रामस्थ या खेळात सहभाग घेतात.
अशी ही बक्षिसांची खैरात….
अंदर मावळातील टाकवे येथील सुरेश गणपत असवले आपल्या भुंगा नावाच्या बैलावर रुपये २,२२,२२२, ऋषीनाथ शिंदे यांचा शंभू बैलावर रुपये ६६०००/, साजन असवले व बाबाजी घोजगे यांच्यावतीने २२०००/तर संतोष पिंगळे यांनी आपल्या बैलावर रुपये ३१०००/इतकी रक्कम बक्षीस म्हणून ठेवली ( Bhadrapad Bailpola) होती.या बैलांना पकडण्यासाठी वेशीवर अनेक धाडसी युवकांनी तरुणांनी गर्दी केली होती.