मावळ ऑनलाईन – विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या ( Bapusaheb Bhonde Highschool) ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल मधील कल्पना चावला स्पेस अकॅडमी मध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन भारत फोर्ज कल्याणी ग्रुपचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व अकॅडमीचे विश्वस्त ॲड माधवराव भोंडे, उपाध्यक्ष नारायण भार्गव, सचिव राधिका भोंडे, व्यंकटेश गंभीर, राजीव साही, संजीव वीर, प्रकल्प संचालक पुष्पेंदु रक्षित आदी उपस्थित होते.

Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : चहा विक्रेत्या तरुणाचा जागीच मृत्यू
यावेळी *साईन शो फ्रीझ ईट * ,प्लॅनिटोरियम शो,रोबोटिक्स ( Bapusaheb Bhonde Highschool) सायन्स एज्युकेशन आदीचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे सहकार्य यास मिळाले. पुढील कार्यक्रमात, AI आणि रोबोटिक्स स्पेस सायन्स एज्युकेशन, यावर कार्यशाळा , नॅॅशनल सायन्स चॅलेंज, या विषयावर प्रकल्प स्पर्धा, होणार आहेत. यात १०००विद्यार्थी सहभागी होणार आहेत. इस्रो व आय आय एस सी चे शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Ashtavinayaka : श्रीक्षेत्र अष्टविनायक मंदिर विकास आराखड्यात हेरिटेजचा सन्मान – अजित पवार
विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमांना भेटी देणार आहेत. ६० विद्यार्थ्यांनी केलेल्या “स्पेस जर्नी ” या अंतराळ शास्त्र व तंत्रज्ञान याविषयीच्या प्रकल्पांचे प्रदर्शनही तीन दिवसीय कार्यक्रमात रोज असणार आहे. यावेळी बोलताना जितेंद्र पाटील म्हणाले, इस्रो आणि डी आर डी ओ मध्ये विद्यार्थ्यानी प्रवेश घेण्यासाठी उद्युक्त व्हावे, त्यांना मार्गदर्शन मिळावे याकरिता अकॅडमी दीपस्तंभा प्रमाणे कार्यरत आहे.
भविष्यात येथून अंतराळ शास्त्रात प्रवीण असे विद्यार्थी घडतील , अंतराळ वैज्ञानिक तयार होतील असे ते म्हणाले. पााटील यांचे हस्ते यावेळी अकॅडमी मध्ये तयार करण्यात आलेल्या चांद्रयान प्रतिकृती, ॲस्ट्रोनॉट प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात ( Bapusaheb Bhonde Highschool) आले.