रयत स्वाभिमानी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
T eam MyPuneCity – बाणेर येथील एम-एजाइल मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यावसायिकाने (Baner News) विनापरवाना रस्ता खोदकाम केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेने कठोर पावले उचलत तब्बल ५ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमागे रयत स्वाभिमानी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण मागणीचा मोठा वाटा असून, हा दंड तातडीने वसूल करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Rashi Bhavishya 30 April 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
रयत स्वाभिमानी संघटनेचे रविराज काळे यांनी सांगितले (Baner News) की, “जर मालपाणी इस्टेटने हा दंड भरण्यात टाळाटाळ केली, तर संपूर्ण पुणे शहरातील त्यांच्या चालू असलेल्या सर्व प्रकल्पांवर ‘वर्क स्टॉप नोटीस’ देण्यात यावी. यासंदर्भात लवकरच शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना पत्र पाठवण्यात येणार आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “या प्रकरणात मालपाणी इस्टेटला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कुणी करत असल्यास, अशा व्यक्तींवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही महापालिका आयुक्तांकडे करणार आहोत.”
पुणे महानगरपालिकेच्या ‘स्ट्रेचिंग पॉलिसी’चा भंग या कामामुळे झाला असून, शहरातील अन्य बांधकाम व्यावसायिकांनीही अशा प्रकारे विनापरवाना विद्युत केबल टाकलेल्या आहेत का? याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली (Baner News) आहे.