मावळ ऑनलाईन –सहकारी संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत आपला कारभार करावा असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी केले.
तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या(Babasaheb Patil) मुख्य कार्यालयाचे उद्घाटन समारंभ प्रसंगी सहकार मंत्री पाटील बोलत होते.
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या या नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, मावळचे आमदार सुनील शेळके, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, पुणे जिल्हा नागरी बँक फेडरेशनचे मानद सचिव ॲड सुभाष मोहिते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे,संस्थेचे संस्थापक व पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक बबनराव भेगडे, पुणे जिल्हा सहकारी फेडरेशनच्या अध्यक्षा रेश्माताई भोसले,संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे, संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, ज्ञानेश्वर मराठे, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, दैनंदिन बचत प्रतिनिधी व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार मंत्री पाटील पुढे म्हणाले की व्याज देणे व घेणे हा कारभार नसून सामाजिक बांधिलकी जपायला हवी सहकार चळवळ बदनाम होऊ द्यायची नाही. सहकार चळवळ वाढवायची आहे व विकसित करायचे आहे. तिला नवीन धोरण आणायचे आहे असेही सहकार मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
संस्थेची आर्थिक उलाढाल सुमारे १७० कोटी रुपये असून ठेवी ४६ कोटी ७३ लाख रुपयांच्या आहेत.
संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भेगडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी संस्थेचे कामकाज व संस्थेने बांधलेल्या मुख्य कार्यालयाचे विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अतुल राऊत यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांनी मानले.