मावळ ऑनलाईन – रिक्षात बसलेल्या एका अनोळखी इसमाने रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने गळा (Attack on Rickshaw driver) चिरून गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशियताचे स्केच देखील पोलिसांनी काढलेले केले आहे.

Sant Tukaram Palkhi : माऊलींच्या अनुपम भेट सोहळ्यानंतर संत तुकोबारायांचे देहुकडे प्रस्थान
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचालक यांनी सकाळी सात वाजता शगुन चौक ते शिरगाव असा रस्ता गाठण्यासाठी एका 18 ते 20 वर्षांच्या युवकास 500 रुपयांच्या भाड्यावर रिक्षात घेतले. प्रवासादरम्यान रिक्षा केंद्रीय विद्यालयाजवळ आली असता त्या युवकाने लघवीसाठी रिक्षा थांबवण्यास(Attack on Rickshaw driver) सांगितले. रिक्षा थांबवली असता, सदर अनोळखी इसमाने अचानकपणे मागून धारदार शस्त्राने रिक्षा चालकाच्या गळ्यावर प्राणघातक वार केला व घटनास्थळावरून पळ काढला .
या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाने रक्ताच्या थारोळ्यात स्वतः रिक्षा चालवत लोकमान्य हॉस्पिटल गाठले व उपचारासाठी दाखल झाले. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यांचे (Attack on Rickshaw driver) प्राण वाचले.
दरम्यान, देहूरोड पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या हल्लेखोर तरुणाबाबत कोणाला माहिती असल्यास कृपया तातडीने देहूरोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
पोलीस अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत (Attack on Rickshaw driver) आहे.