मावळ ऑनलाईन –सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2025) हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व ( Annual Horoscope 2026) केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो. ( Annual Horoscope 2026)
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026)

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104.
कन्या रास – सूक्ष्म नियोजन आणि प्रत्येक पावलावर मिळणारसिद्धी ( Annual Horoscope 2025)
कन्या रास ही राशीचक्रातील सहावी रास असून, राशीस्वामी बुध आहे. ही पृथ्वी तत्वाची द्विस्वभावी रास आहे. व्यवहारदक्ष आणि चिकित्सक, विचार करून निर्णय घेणारे व्यक्ती या राशीतील असतात. कामाच्या ठिकाणी नियोजन करणे, सुसूत्रता आणणे हे गुण या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसतात.
आपले बोलणे आणि चालणे मापदंडानुसार असते. विचारात बालिशपणा न दिसणे, विचारांचा थांगपता न लागणे, लाजाळूपणा, आळशीपणा, चिकित्सकपणा, आत्मविश्वास कमी असणे किंवा इतरांचा हेवा करणारी, भावनांमध्ये वाहून जाणे – अशा व्यक्ती या राशीच्या असतात.
आपण अगोदर इतरांची मने जाणून घेता, मात्र आपल्या मनाचा थांबपत्ता इतरांना लागू देत नाही. थोडीशी मुसद्दी असते, पण कोणताही विषय आपल्याला अवघड वाटत नाही. कोणत्याही कामात भावनेच्या भरात झोकून देण्याचा आपला स्वभाव नाही. आपणाकडे हजरजबाबीपणा, वाक्चातुर्य आणि दूरदर्शीपणा हे गुण
नैसर्गिक आहेत.
आपल्यामध्ये धडाडी, शौर्य आणि पराक्रम यांची कमी असते, त्यामुळे काही वेळा आपली फसवणूक होते, कारण खरे बोलणे सहज दाखवता येत नाही. नेतृत्व क्षमता दृढ नसल्यामुळे, पडद्यामागून काम करणे आपणास अधिक पसंत असते. आपले निरीक्षण चौफेर व खोलवर असते, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाची गोष्ट
सूक्ष्मपणे विचार करून अनेक बाजू मांडता. कन्या रास स्त्री वर्गाला फार अनुकूल आहे. घरातील गोष्टी
दुसऱ्यांपर्यंत सांगत नाहीत. या राशीच्या स्त्रिया संयमी आणि विवेकी असतात.( Annual Horoscope 2025)
नक्षत्रांनुसार स्वभाव :-
या राशीमध्ये उत्तरा, हस्त आणिचित्रा ही नक्षत्रे येतात.
उत्तरा नक्षत्र: तेजस्वी, स्वाभिमानी, कलेच्या क्षेत्रामध्ये कुशल, आत्मविश्वासी,समानतेचे व्यवहार करणारी व्यक्ती.
हस्त नक्षत्र: अत्यंत उत्साही, गुडशास्त्राची आवड असलेली, शांतप्रिय, विनम्र, विद्वान, धनिक, प्रभावशाली व्यक्तिमत्व. सर्व गुणसंपन्न, सुंदर कपडे व दागिन्यांची हौस.
चित्रा नक्षत्र: विविध वस्त्रे व फुलांची आवड. डोळे तजेलदार व बोलके, स्वभावात तामसी व संशयी वृत्ती दिसते. आपली मते गुप्त राखणारी, चतुर स्वभावाची व्यक्ती.
चालू वर्षाचे भविष्य ( Annual Horoscope 2025)
राशीच्या दशम व लाभ स्थानातून गुरुचे भ्रमण, सप्तमातून शनी नेपच्यूनचे भ्रमण, षस्ठ व व्ययस्थानातून राहू-केतूचे भ्रमण, हर्षल व प्लूटोचे भ्रमण, पंचमातून भ्रमण यावर्षी होत असून तुमच्या करिअरमध्ये मोठे यश, प्रतिष्ठाव पदोन्नतीची संधी आहे.
नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल, व्यवसायिकांना व्यवसाय वृद्धी आणि व्यवसाय विस्तार करण्याची संधी मिळेल. सामाजिक जीवनात मान-सन्मान वाढेल. सरकारी कामे अथवा अन्य उच्च अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. मोठे भाऊ, बहीण आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. अनेक दीर्घकाळाच्या योजना किंवा इच्छा पूर्ण होऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
विद्यार्थी वर्गाला व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी वर्षाचा पूर्वार्ध उत्तम आहे. जोडीदाराच्या अपेक्षा वाढू शकतात. संबंध अधिक स्थिर व परिपक्व बनतील; मात्र संयम आवश्यक आहे. तुमची विश्वासार्हता वाढल्यामुळे नवीन व्यावसायिक करार पूर्णत्वास जातील आणि नवीन तंत्रज्ञानाचा
अवलब कराल. चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट टाळा. परदेशी करारामध्ये विशेष काळजी घ्यावी, मुद्रे संबंधी समस्या जाणवू शकतात.
अध्यात्मिक रुची वाढेल. जीवनविषयक तत्वज्ञान व आपल्या मूल्यांमध्ये मोठे बदल होतील. वेगळया विचारांचा स्वीकार कराल. वैवाहिक जीवनात भावनिक गुंतवणूक वाढेल; काही वेळा गैरसमज होऊ शकतो. नोकरी, आरोग्य व दैनंदिन जीवनाच्या कामांच्या सवयीमध्ये मोठी सखोल रचना होईल. विद्यार्थी वर्गाला जबाबदारीचे परिवर्तन स्वीकारावे लागेल. एकंदरीत कन्या राशीसाठी हे वर्ष नोकरी व आर्थिक लाभाच्या दृष्टीने सकारात्मक राहणार आहे.
उपासना आणि उपाय ( Annual Horoscope 2026)
*कृष्ण उपासना, विठ्ठल-रुक्मिणी उपासना केल्यास उत्तम राहील.
* चुलते, काका याना मदत करावी. गाईची सेवा करावी.
*काच अथवा शीशे या धातूची गोळी जवळ ठेवावी.
*देवी सरस्वतीला लाल फुल अर्पण करावे.
*मंगळवारी गणेश मंदिरात हरभरा, डाळ, फुल, दूर्वा यांचे
दान करावे.
शुभ घटक ( Annual Horoscope 2026)
शुभ रंग: हिरवा, फिकट पिवळा, पांढरा
भाग्यरत्न: पांढरा पुष्कराज, पाचू तसेच एमथिस
शुभ दिनांक: कोणत्याही महिन्याचे ५,१४,२३
भाग्यकारक वयोवर्षे: २०, २९, ३७,४६, ५१,६०