मावळ ऑनलाईन –सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
राशीभविष्य म्हणजे विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज आणि अस्तित्वाचा महाग्रंथ. या क्षणापासून ते अनंत काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो.
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104
वृषभ रास
आर्थिक पाया भक्कम- गुंतवणुकीचा सुवर्णयोग
वृषभ रास ही राशीचक्रातील द्वितीय रास असून, स्त्रीस्वभावी, पृथ्वी तत्वाची आणि स्थिर प्रवृत्तीची रास आहे. सौंदर्य, तेज, दीर्घउद्योग, बोलण्यात लाघव, जबरदस्त आशावाद आणि जगातील सर्व सुखसोयींची लालसा – हे या राशीच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख गुण आहेत. वृषभ राशी च्यास्त्रिया अतिशय सुंदर,
आकर्षक आणि सौंदर्यप्रेमी असतात. या राशीच्या व्यक्तींना नवनवीन कपडे, शोभिवंत वस्तू, वाहन आणि घर यांची विशेष आवड असते. मैत्री आणि शब्द यांना आपण अनुरूप असता, घेतलेल्या निर्णयाशीकमाली चे तत्त्वनिष्ठ राहता. आपण आनंदी आणि आशावादी आहात; सुखाची व्याख्या ही
इतर राशीपेक्षा आपल्या दृष्टीने वेगळी असते.आपण सहनशील, सोशिक आणि गोड बोलणारे आहात. त्यामुळे सर्वांना हवेहवेसे वाटता.साहित्य, कला, संगीत, नाट्य, चित्रपट यांत रस असलेले आपण खरे रसिक आहात.
वृषभ राशीला “संसारप्रिय रास” म्हणतात.आपल्याकडे मित्रमंडळी भरपूर असतात. सेवा करणे, नोकरी करणे किंवा एखाद्या संस्थेचे, समूहाचे किंवा ट्रस्टचे व्यवस्थापन करणे ही कामे आपण उत्तमरीत्या पार पाडता. आपला स्वभाव निर्मोही असून, निरपेक्ष बुद्धीने काम करूनघेणे ही आपली खासियत आहे.
व्यवहारकुशलता, व्यापारी दृष्टिकोन आणि आर्थिक मूल्यांचाअचूक अंदाज लावण्याची कला आपणास अवगत असते. कधी कधी हट्टीपणा आणि अहंभाव जाणवतो, पण कोणत्याही अडचणीवर आपण उपाय शोधण्यात पटाईत आहात.
नक्षत्रांनुसार स्वभाव :-
वृषभ राशीत कृत्तिका, रोहिणीआणि मृग ही नक्षत्रे येतात.
कृत्तिका नक्षत्र: आर्थिक सुबत्ता, चातुर्य, विद्या, स्वाभिमान आणि राजेशाहीची आवड असते. असे जातक साहसी, दुसऱ्यांचे कौतुक करणारे, पण कधी कधी गर्विष्ठ व हट्टीस्वभावाचे असतात.
रोहिणी नक्षत्र: या नक्षत्रातील व्यक्ती मधुरवाणी, पवित्र आचरण असणाऱ्या, शांत, सत्त्वगुणी व स्थिर बुद्धीच्या असतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक व सौंदर्यपूर्ण असते. ही मंडळी विलासी, श्रीमंत, व्यापारी किंवा प्रेमळ स्वभावाची असतात. काहीजण कलाक्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवतात.
मृग नक्षत्र: या नक्षत्रातील व्यक्ती चपळ, उत्साही, चंचल आणि काही वेळा भित्र्या स्वभावाच्या असतात. भूमी, शेती आणि वाहनसुख यांचे भोग घेणाऱ्या असतात. काही व्यक्तींना शेती किंवा निसर्गाची प्रचंड आवड असते.
चालू वर्षाचे भविष्य (२०२५)
या वर्षी गुरूचा गोचर धनस्थान आणि तृतीय स्थानातून, शनीचा गोचर लाभस्थानातून, तसेच राहू केतूचा गोचर दशम व चतुर्थ स्थानातून होत आहे.हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो अनुक्रमे लग्न, भाग्य आणि नवम स्थानातून भ्रमण करीत आहेत. या ग्रहस्थितीमुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि बचतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. लेखन आणि बौद्धिक कार्यासाठी हा काळ उत्तम ठरेल. प्रापचिक गोष्टींची कमतरता जाणवणार नाही. मातीलशौर्य आणि सक्रियता वाढेल.तुमचे संवादकौशल्य प्रभावी ठरेल.
नवीन कार्याची सुरुवात कराल; आशा आणि आकांक्षा वाढतील. डिसेंबर ते मार्च हा काळ विशेषतः समृद्धीचा राहील. मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. मात्र मोठ्या भावंडांशी किंवा मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंध जपावेत.करिअरमध्ये मोठे बदल होऊ शकतात; अनपेक्षित यश मिळेल.सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल, त्यामुळे महत्त्वाकांक्षा जागृत राहील.
आईच्या आरोग्याकडेलक्ष द्यावे लागेल.मालमत्ता खरेदीत थोडा विलंब किंवा दिशाभूल होऊ शकते. या वर्षी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वात आणि जीवनशैलीत नवा आत्मविश्वास आणाल. कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढेल. सामाजिक आणि सामूहिक कार्यात मित्रांचा भावनिक आधार मिळेल, सत्ता आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी महत्त्वाकांक्षी व्हाल. वडिलांशी संबंधांमध्ये काही बदल जाणवू शकतात – त्यांचा
समतोल राखावा.
उपाय व उपासना :-
*महालक्ष्मीची उपासना केल्यास उत्तम फळ मिळेल.
*पंचमुखी हनुमानाचे दर्शन लाभदायक ठरेल.
*शंकराच्या पिंडीला मलाई व श्वेतचंदनाचा लेप करावा.
सप्त धान्याचे दान करावे.
*मुंग्यांना साखर आणि गाईलागोड चपाती द्यावी.
**भैरव, कार्तिकेय, दुर्गा देवीव गणेश मंदिरात सेवा आणि
दर्शन ध्यावे.
शुभ घटक
शुभ रंग: पांढरा, हिरवा, गुलाबी.
भाग्यरत्न: नीलम आणि डायमंड (अनुकूल) तसेच *मूनस्टोनचा वापरही शुभ ठरेल.
शुभ वयोवर्षे :* २०, २८,३६,४५,५३