situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Annual Horoscope 2026 : वार्षिक राशीभविष्य 2026 – मीन रास

Updated On:

मावळ ऑनलाईन –सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2025) हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.

काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व ( Annual Horoscope 2026) केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!

ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो. ( Annual Horoscope 2026)

राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;

तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.

आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026)


Wanawadi Police : वानवडी पोलिसांकडून कोंबड्यांच्या झुंजींवर धाड – सहा जणांना अटक, सुमारे ५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104
.


मीन रास – खर्च आणि मानसिक शांतता यांचा समतोल महत्वाचा ( Annual Horoscope 2026)

मीन रास ही राशीचक्रातील बारावी रास असून, जलतत्त्वाची स्वभावी स्त्री राशी आहे. या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीचे चिन्ह विरुद्ध दिशेला तोंड असलेले दोन मासे आहेत. मीन राशीतील व्यक्ती भावनाप्रधान असतात. मनाचा हळवेपणा, दयाळूपणा आणि गोरगरिबाची जाणीव यांचे दर्शन त्यांच्यात होते. या राशीतील व्यक्ती अनाथ लोकांची मदत करतात व त्यांच्या चेहऱ्यावर सात्विकतेचे तेज असते. प्रसन्न वृत्ती, शांतपणा व भव्यतेची झलक या व्यक्तींच्या स्वभावात असते.

Maval: इंदोरी-वराळे गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई भागवत यांची खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत विशेष भेट — मावळच्या राजकारणात नवीन समीकरणाची चर्चा

ही व्यक्ती दयाळू, मायाळू व ममताळू असते. भांडणतंटा न करता सर्वांशी जुळवून घेण्याचा व गोडी-गुलाबीने राहण्याचा स्वभाव असतो. मीन राशीच्या व्यक्ती आशावादी असतात. परमेश्वराच्या गु़ढ शक्तीविषयी त्यांना खूप आकर्षण असते. साहित्य, भक्ती, संगीत, प्रवचन, मंत्रतंत्र यांची आवड असते.
मीन राशीतील व्यक्ती येणाऱ्या प्रश्नांचा विचार भावनेने करतात.नाजूकपणा, कोमलपणा, नम्रता, दया, क्षमा, शांती यांचाअनुभव त्यांच्या स्वभावात आढळतो.

मीन राशीतील व्यक्ती सामान्यतः संत, आचार्य, तपस्वी, ऋषी-मुनी यांच्या शोधात असतात. तसेच प्राध्यापक, दलाल, हिशोब तपासणारे, प्रवचनकार, पुरोहित, कीर्तनकार, शेअर्स ब्रोकर, दूध-मिठाईचे व्यापारी अशा क्षेत्रातही मीन राशीचे व्यक्ती आढळतात.

नक्षत्रांनुसार स्वभाव :- ( Annual Horoscope 2026)

मीन राशीमध्ये पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती ही नक्षत्रे येतात.

पूर्वाभाद्रपदा नक्षत्रातील व्यक्ती: हुशार, धनिक, धार्मिक, मधर भाषा बोलणारी, सौम्य, सात्विक, व्यवहारकुशल असते.

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी आहे. नोकरीमध्ये कष्ट वाढले तरी उत्तम पगार व प्रमोशन मिळेल. शिक्षण व कला क्षेत्रात यश मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील, आणि प्रेमिकांमधील
पूर्वीचे गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. परदेशी व्यक्ती किंवा ऑनलाइन आंतरराष्ट्रीय
गटाशी जोडल्यास प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. सोशल मीडिया किंवा संवाद शैली या वर्षी अधिक
प्रभावी राहतील.

चालू वर्षाचे भविष्य ( Annual Horoscope 2026)

साडेसातीचा मधला टप्पा चालू असला तरी, गुरुचे शुभ भ्रमण असल्यामुळे त्याची तीव्रता जाणवणार नाही. फक्त मानसिक शांततेची काळजी घ्या आणि निर्णय घेताना गोंधळ करू नका. जीवनात शिस्त व जबाबदारी वाढली तरी हे वर्ष व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी व आत्मपरीक्षणासाठी महत्त्वाचे राहील. दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना विशेष काळजी घ्या.

सर्व बाबी तपासूनच निर्णय घेणे उचित आहे. काही व्यक्तींना परदेशात स्थायिक होण्याची संधी मिळू शकते.
अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे. कर्ज, शत्रू, आरोग्य या बाबतीत विचारपूर्वक निर्णय
घेतल्यास दिशाभूल होणार नाही. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना अचानक मोठी प्रसिद्धी मिळेल. भावा-बहिणीमध्ये ताणतणाव टाळा. नवीन तंत्रज्ञान किंवा माहितीचा वापर करून येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील. मित्रांशी भागीदारी करताना योग्य ती दक्षता घ्या.


खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुरूचे शुभ भ्रमण असल्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद व व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. कोणत्याही गोष्टीवर थेट विश्वास न ठेवता त्यांचे विश्लेषण
करा.

उपासना उपाय ( Annual Horoscope 2026)
*लक्ष्मीनारायण व गणपतीची उपासना केल्यास वर्ष लाभदायक राहील.
*मंदिरात केळी अर्पण करावे.
*बहिण व इतर गरजू स्त्रियांची मदत करावी.
*मारुती मंदिरात शेंदूर, लवंग, नारळ ठेवावे.

*माकडांना चणे व केळी द्यावीत.
*वडाच्या झाडाला दूध व साखर वाहावे.
*धर्मदाय संस्था व अन्नछत्रांमध्ये सफरचंद, गोड, तांदूळ दान करावे.

शुभ घटक :- ( Annual Horoscope 2026)
शुभ रंग: गुलाबी, निळसर, पोपटी, केसरी
भाग्यरत्न: प्रवाळ, पुष्कराज, ग्रीन झेड
शुभ दिनांक: कोणत्याही महिन्याचे २,१२, २१,३०
भाग्यकारक वयोवर्ष: ९, १८, २७, ३६, ४५, ५४,६३.

Follow Us On