मावळ ऑनलाईन –सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026 ) हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ ( Annual Horoscope 2026) आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो.
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो. ( Annual Horoscope 2026)
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104.
सिंह रास – नेतृत्वाचा राजदंड तुमच्या हाती
सिंह रास ही राशी चक्रातील पाचवी रास असून, या राशीचे चिन्ह सिंह आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून स्थिर स्वभावाची, अल्पप्रसव असून राशीचा स्वामी रवी आहे. ही वंद्या राशी आहे. या राशीच्या व्यक्तीमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि तेजस्वीपणा असतो. आकर्षकता आणि भव्यता ही व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टये आहेत.
आपण स्वातंत्र्यप्रिय आहात आणि कोणाच्या हाताखाली ( Annual Horoscope 2026) काम करणे आवडत नाही. त्यामुळे इतरांचे बोल आणि हुकूमशाही आपण सहन करणार नाही, तरी वेळ पडल्यास योग्य कालखंडात सर्व हिशोब चुकता करता. आपणास स्वतःचे विचार आणि कल्पना असतात. तत्व आणि स्वत्व जपण्याकडे आपला कल जास्त असतो. आपल्या कुलाबद्दल आणि परिवारातील व्यक्तींवर, पूर्वजावर आणि परंपरेवर आपल्याला अभिमान असतो.
घरातील व्यक्ती, मित्रपरिवार आणि सहकारी यांच्याशी आपले संबंध इतर व्यक्तीपेक्षा वेगळे असतात. आपण त्या व्यक्तींबद्दल दिलदार असता; कितीही अडचणी आल्या तरी ठाम राहता. वेळप्रसंगी नातेवाईक आणि मित्रपरिवाराला आपण मुक्तपणे मदत करता. आपण स्वयंभू आहात असे आपल्याला मनोगत वाटते. आपले मन विशाल आणि उदार आहे. आपली स्तुती आणि वाहवा लोकांनी करावी असे ही मनोगत वाटते.
आपली उत्सुकता, स्पष्टवक्ते पणा, बुद्धीचा योग्य वापर करून आपण यश खेचून आणता. त्यामुळे आपण समाजात लोकप्रिय आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
नक्षत्रांनुसार स्वभाव :- ( Annual Horoscope 2026)
सिंह राशी मध्ये मघा, पूर्वाआणि उत्तरा ही तीन नक्षत्रे येतात.
मघा नक्षत्रः सतत उद्योगी, सेवासंपन्न, अत्याधिक उतावळे कोणत्याही गोष्टीचे पटकन अनुमान करणारे, कुशल, धनवान, उद्योगशील, बलवान, गर्विष्ठ, साहसी, जगप्रसिद्ध, शरीर मजबूत, देवभक्तआणि पितृभक्त, संपादक वेगळे.
पूर्वा नक्षत्र: दानशूर, प्रिय भाषिणी, चपळ, कांतीमान, श्रद्धावान, राजसेवक आणि सत्वगुणी. प्रवासाची आवड, नाट्यकलांची आणि ऐश्वर्याची आवड, धनाढ्य व्यापारी आढळतात.
उत्तरा नक्षत्र: मानी व मेहनती, परिवार व वाहन यांचे सौख्य मिळवणारी, कला-कौशल्य यामध्ये आवड असलेली.
चालू वर्षाचे भविष्य
राशीच्या लाभ व व्यवस्थानातून गुरुचे भ्रमण, अष्टम स्थानातून शनीचे भ्रमण, तसेच अष्टमातून नेपच्यून, सप्तम व लग्नस्थानातून राहू-केतूचे भ्रमण, दशमातून हर्षल व शष्टातून प्लूटोचे भ्रमण होत आहे. अशा प्रकारे या वर्षीची प्रमुख गृहस्थिती ठरली आहे. ( Annual Horoscope 2026)
पूर्वार्धात गुरुचे भ्रमण अनुकूल असल्थामुळे उत्पन्नात वाढ होईल. इच्छापूर्तीसाठी हा कालखंड सर्वोत्तम आहे.
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. मित्र वर्गाचे सहकार्य उत्तम राहील. संततीचे प्रश्न सुटतील आणि संततीकडून लाभ व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.उत्तरार्धात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शेअर्स मार्केटमध्ये चुकीची गुंतवणूक होऊ शकते. मात्र आध्यात्मिक बाबतीत रुची वाढेल. परदेशी प्रवासाचे योग दर्शवितात.
शिक्षण व उच्च शिक्षणासाठी हा कालखंड अनुकूल राहील. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये अचानक गोंधळ किंवा गडबड होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ अथवा नुकसान होऊ शकते. गुप्त गोष्टी आणि संशोधनाची रुची वाढेल. गरजूंना मदत करण्याचा कल राहील. वारसा हक्काच्या बाबतीत यश
मिळू शकते. सासरच्या लोकांशी बोलताना आणि संबंध जपताना काळजी घ्या. वैवाहिक जीवनात अनपेक्षित घटना घडतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठे लाभ होतील, मात्र अतिविश्वासपणा टाळावा. ( Annual Horoscope 2026)
नवीन व आकर्षक लोकांच्या संपर्कांत येईल. आत्मपरीक्षण व आत्मशोधावर लक्ष केंद्रित कराल, व्यक्तिमत्वात काहीसा बदल दिसून येईल, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, नोकरीच्या ठिकाणी संशोधन किंवा नवीन बदल केल्यामुळे वरिष्ठ अधिकारी कौतुक करतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मिळते-जुळते घ्यावे लागेल. सत्ता संबंधातील समीकरणे बदलतील. कार्यपद्धतीमध्ये बदल करून जीवन जगावे लागेल. एकंदरीत कल्पनाशक्ती आणि भावनिक आधार वारंवार बदलतील.
उपासना आणि उपाय
* सूर्य उपासना, मार्तंड व भैर वाची उपासना केल्यास उत्तम राहील.
*वाहत्या पाण्यात बदाम आणि नारळ सोडावे.
*सोमवारीमहादेवावर बेलपत्रे व काळे तीळ पिंडीवर वाहावे.
* देवी सरस्वती अथवा दुर्गा देवी यांचे ग्रंथपठण किंवा मंदिरात
दान करावे.
*गळ्यात किंवा हातामध्ये चांदीचा वापर करावा.
*बुधवारीउडीद पाण्यात सोडावे.
शुभघटक ( Annual Horoscope 2026)
शुभरंग: नारंगी, सोनेरी, केशरी
भाग्यरत्न: प्रवाळ, डायमंड, जिरकॉन
शुभदिनांक: कोणत्याही महिन्याचे १,१०,१९, २८
भाग्यकारक वयोवर्षे: २१,२५, २९. ३८,४७,५४.