मावळ ऑनलाईन –सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026) हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व ( Annual Horoscope 2026) केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो. ( Annual Horoscope 2026)
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026)

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104.
धनु रास – भागीदारीतून प्रगती, व्यक्तिगत व व्यावसायिक यश ( Annual Horoscope 2026)
धनु रास ही राशीचक्रातील नववी रास असून, अग्नी तत्वाची द्विस्वभावी पुरुष राशी आहे. या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील, सात्विक, न्यायप्रिय, परोपकारी असतात. त्यांच्या अंतकरणातील कोश सुप्त अवस्थेत असतो, जीवनाबद्दल श्रद्धा असते, आणि न्यायदेवताच्या निर्णयाप्रमाणे कर्म करतात. परोपकारी असतात, अधिकारांची हौस नसते, न्याय व धार्मिकता जपतात. तसेच मुलासाठी अथवा कुटुंबासाठी सदैव खर्च करणारे, वास्तु व वाहन सौख्याची आवड असणारे, हसतमुख व समाधानी असतात. धार्मिकतेची आवड, साधुसंत, ऋषी- मुनी, सप्तपुरुष, आचार्य, महानयोगी यांच्याशी संबंधित
गुणधर्म राखणारे व्यक्ती यामध्ये येतात.
धनु राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, सभ्यता असते. अनेक मोठमोठ्या धार्मिक व
अध्यात्मिक संस्थांमध्ये ट्रस्टी किंवा सदस्य म्हणून काम करताना धनु राशीचे लोक आढळतात. समाजाचे
आधारस्तंभ, दीपस्तंभ, मार्गदर्शक या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते. गरीब व दिनदुबळ्या लोकांबद्दल सहानुभूती व करुणा( Annual Horoscope 2026) असते.
लोकहिताच्या निर्णयाला प्राधान्य देत असल्यामुळे, सामाजिक संस्था, हॉस्पिटल, धार्मिक संस्था, प्राण्यांसाठी
गोशाळा अशा ठिकाणी धनु राशीचे लोक हमखास सापडतात. धनु राशीच्या व्यक्तींमध्ये नवीन कल्पना, मुलगामी विचार, परंपरा, इतिहास व संस्कृती याविषयी आदर असतो. क्रीडा क्षेत्रात धनु राशीचे लोक चमकतात. काही धनु राशीचे व्यक्ती कायदा व सुव्यवस्था यामध्ये काम करताना न्याय व शिस्त यांचा ताळमेळ साधतात आणि त्यामुळे ते समाजप्रिय होतात. धनु राशीमध्ये परोपकारी वृत्ती असते.
नक्षत्रांनुसार स्वभाव :- ( Annual Horoscope 2025)
धनु राशीमध्ये पूर्वा शाळा व उत्तरा शाळा ही नक्षत्रे येतात.
मूळ नक्षत्राची व्यक्ती: सशक्त, दणकट, बलवान, धाडसी, काही प्रमाणात चंचल, एकांतप्रिय; कुळात श्रेष्ठत्व गाजविण्यास आवडते.
पूर्वा शाळा नक्षत्राची व्यक्ती: गर्विष्ठ, मैत्री टिकवणारी, बलवान, धनवान, सामान्य बुद्धिमत्तेची, पैशाची लोभी; आनंदी व सु-स्वभावाची. नोकरीच्या आवड असणारी, लबाडीच्या व्यवहारात फसगत होऊ शकते.
चालू वर्षाचे भविष्य ( Annual Horoscope 2026)
गुरुच्या सप्तम स्थानाच्या भ्रमणामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद व सुसंवाद राहील. व्यावसायिक भागीदारीत यश मिळेल. पूर्वार्धात इच्छित लाभ, मित्रांचे अपेक्षित सहकार्य, छोटे प्रवास इत्यादी गोष्टींसाठी अनुकूल कालखंड आहे. लेखकांना प्रसिद्धी व मानसन्मान प्राप्त होईल. ( Annual Horoscope 2026)
घराचे रंगरंगोटी अथवा घर बदलीचे संकेत दिसू शकतात. भावाबहिणीकडून अपेक्षित मदत मिळाल्यामुळे पुढील कामे विना अडथळे पूर्ण होतील. उत्तरार्धात अचानक धनलाभ किंवा धार्मिक आवक वाढण्याची शक्यता आहे, पण आरोग्याची दक्षता घ्यावी लागेल. दात, घसा, नाक, पोटाचा खालचा भाग यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंब, घर आणि जमीन मालमत्ता याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. हितशत्रूच्या कारवाया अधूनमधून उद्धवतील. नोकरीच्या ठिकाणी व कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे.
स्वभावामध्ये धीर व गंभीरता वाढेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही काळ कामाच्या निमित्ताने घरापासून दूर राहावे लागेल. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत, परंतु त्यामध्ये विलंब लागू शकतो. तुमचा आत्मविश्वास व धाडस अनपेक्षित वाढू शकते. लेखन, कला व संवाद यांच्या माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी टिकवण्यासाठी योग्य ती दक्षता घ्या. धर्माबद्दल पारंपारिक विचारांमध्ये अलिप्तता येऊ शकते. उच्च शिक्षणात अधिक एकाग्रता ठेवून यश मिळवावे लागेल. धर्मगुरू व साधुसंत यांच्या सानिध्यात वेळ घालवाल.
आरोग्य व दैनंदिन कामाच्या सवयींमध्ये मोठे बदल दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी तांत्रिक प्रयोग किंवा संशोधन यासारख्या गोष्टींचा उपयोग करून आपले अस्तित्व सिद्ध कराल. घरगुती गडबड व गोंधळामुळे करिअर मधील सहकार्य व संबंध बिघडू देऊ नका. एकंदरीत, धनु राशीला यावर्षी घरातील वातावरण व कुटुंबातील वातावरण व मोठे प्रवास यांच्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक हाताळावे लागेल.
उपासना आणि उपाय ( Annual Horoscope 2026)
*श्री दत्त व शिवशंकराची उपासना केल्यास वर्ष अतिउत्तम राहील.
*गळ्यात अथवा अंगावर सोन्याचा वापर करावा.
*घरात गंगाजल ठेवावे व शिंपडावे.
*घर स्वच्छ ठेवावे.
*सुगंधी अत्तर किंवा रूम फ्रेशनरचा वापर करावा.
*साधुसंतांची सेवा करावी.
*मंदिरात हळकुंड, तूप, दही, कापूर दान करावे.
शुभ घटक: ( Annual Horoscope 2026)
शुभ रंगः चमकदार पिवळा, लाल, डाळिंबी
भाग्यरत्न: माणिक; तसेच ओनेक्स व पुष्कराज
शुभ दिनांक: कोणत्याही महिन्याचे ३, १२, २१, ३०
भाग्यकारक वयोवर्षे: १८, २२, ३४, ४०, ४९,५४,६३.