situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Annual Horoscope 2026 : वार्षिक राशीभविष्य 2026 -मिथुन रास

Updated On:

मावळ ऑनलाईनसर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.

काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!

ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो.

राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;

तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.

आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


Wanawadi Police : वानवडी पोलिसांकडून कोंबड्यांच्या झुंजींवर धाड – सहा जणांना अटक, सुमारे ५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104
.

मिथुन रास
संवाद आणि संपर्कातून संधीचा महापूर

मिथुन ही राशीचक्रातील तिसरी रास असून, वायु तत्त्वाची आणि द्विस्वभावी रास आहे. उत्तम स्मरणशक्ती असणारी, बौद्धिक कामे बुद्धी आणि चातुर्याने करणारी, तसेच संगीत, कला यामध्ये विशेष आवड असलेली ही रास सतत प्रवासाची आवड असलेली आणि बुद्धीप्रधान आहे. वाचन, चिंतन, मनन, संशोधन आणि व्यासंग या क्षेत्रात आपली ख्याती आहे. प्रसंगावधान, समयसूचकता, हजरजबाबी चातुर्य, हसतहसत दुसऱ्यावर टीका करण्याची कला, वकिलाला लागणारी गुणवैशिष्टयेही आपल्याकडे आहेत. अनेक
भाषांवर प्रभुत्व असते, चर्चासत्रे, प्रवचने, वृत्तपत्रे आणि बौद्धिक चळवळीही आपल्या आवडीची खरीखुरी क्षेत्रे आहेत.

आपल्या जीवनात विचारात चढ-उतार असतात. आपल्याला बुद्धीवादी खेळ आवडतात आणि नेतृत्वाचे सल्लागार म्हणून आपणास काम करणे अधिक पसंत असते. जगात नवनवीन काय चालले आहे, याचे कुतूहल आपल्याला असते आणि आपण शोधघेता. साहित्य, काव्य, नाट्य यासारख्या गोष्टी आपल्याला
मनापासून आवडतात. आपले शस्त्र म्हणजे आपले शब्द; बोलण्याच्या पद्धतीमुळे आपण लोकप्रिय होता. आपली ज्ञानसाठविण्याची कला जोपासता, जी इतर राशीपेक्षा वेगळी आहे.

नक्षत्रांनुसार स्वभाव :-

मिथुन राशीत मृग, आद्रा आणि पुनर्वसु हे नक्षत्रे येतात.

मृग नक्षत्र: या व्यक्तीचा स्वभाव धार्मिक, यात्रा प्रेमी, धनयुक्त, साहसी, विवेकी, वाहन आणि भूमीचा उपभोग घेणारी असतो. तसेच हुशार, विद्वान, गतिशील, उत्साही आणि पराक्रमी असतात.

आद्रा नक्षत्र: या व्यक्ती उग्र स्वभावाच्या, चंचल, क्रोधी आणि संशयी असतात. हेलोक हिंसक, कृतघ्न, कठोरपणा असलेले आणि गुढ विद्येची आवड असणारे असतात. विद्या आणि बुद्धी तीक्ष्ण असते.

पुनर्वसु नक्षत्र: या व्यक्ती व्यवहार कुशल, विद्वान, कोमल माणुसकी जपणारे, साहित्यप्रेमी, सौम्य आणि संतोषयुक्त मनाचे असतात. . कला कौशल्य संपन्न, लोकसेवा करणारी,ईश्वर भक्त, गायनाचीआवड असलेली ही मंडळी असतात.

Maval: इंदोरी-वराळे गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई भागवत यांची खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत विशेष भेट — मावळच्या राजकारणात नवीन समीकरणाची चर्चा

चालू वर्षाचे भविष्य
राशीच्या प्रथम आणि द्वितीय स्थानातून गुरुचे भ्रमण, दशम स्थानातून शनी आणि नेफ्च्यूनचे भ्रमण, तृतीय स्थानातून राहू, हर्षल आणि प्लूटोचे व्यय भ्रमण, तसेच अष्टमस्थानातून भ्रमण होत आहे. या ग्रहस्थितीनुसार या वर्षाची प्रमुख गृहस्थिती ठरली आहे.

आरोग्य आणि व्यक्तिमत्वात मोठी सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आशा आणि इच्छा वाढतील. धनसंपत्तीमध्ये वृद्धी होईल.

कुटुंबामध्ये एखादे धार्मिक अथवा मंगल कार्य निर्विध्न पार पडेल. सार्वजनिक जीवनात मोठी जबाबदारी ध्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी कष्ट आणि शिस्त आवश्यक आहे. नोकरीमध्ये प्रमोशन व यश मिळेल, पण ते कठोर परिश्रमानंतर मिळेल. घर आणि कामामध्ये ताळमेळ राखणे थोडेसे कठीण जाईल.

तुम्ही कार्यक्षेत्रात एक मजबूत ओळख निर्माण कराल. लांबचे प्रवास व परदेशी प्रवास होऊ शकतात. धर्माबद्दल विचारामध्ये आधुनिकता येईल. उच्च शिक्षणामध्ये मोठा लाभ होईल. धाडसामध्ये कमी-जास्तपणा जाणवेल. लहान भावंडांशी संबंध काहीसे तटस्थ राहतील.संवादात अधिक स्पष्टता आवश्यक आहे.

सदृश्य, गुप्त बाबी आणि अज्ञात गोष्टींमध्ये, तसेच जुन्या रहस्यमय गोष्टींत रुची वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात आदर्शवादामुळे अस्पष्टता किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आर्थिक भागीदारीमध्ये दूरदृष्टी आवश्यक आहे. आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास हे वर्ष समृद्धीचे आणि समाधानाचे राहील.

उपासना आणि उपाय


*विष्णू आणि राधाकृष्ण यांची उपासना केल्यास फलदायी राहील.

*गणेश मंत्राचा जप करावा.

*चणे व केळी मंदिरात दान करावे.

* सकाळी आंघोळीनंतर केशर आणि गंध कपाळावर लावावा.

*वाहत्या पाण्यात नारळ, गूळ, हरभरा डाळ सोडावी.

*भैरव, कार्तिकेय, दुर्गा देवी आणि गणेश मंदिरात सेवा व दर्शन घ्यावे .

शुभ घटक
शुभ रंग :- हिरवा, फिकट गुलाबी, चमकदार पोपटी.
भाग्यरत्न :- पाचू, तसेच पांढरा पुष्कराज लाभदायक.
शुभ दिनांक :- कोणत्याही महिन्याचे ५,१४,२३.
भाग्यकारक वयोवर्ष :- १९, २७, ३५,४४,५३,६२.

Follow Us On