मावळ ऑनलाईन – साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार” (Annabhau Sathe Award ) देण्यात येतो. यावर्षी पुण्यातील रिता इंडिया फाउंडेशनच्या विश्वस्त संस्थापिका एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया आणि संस्थापिका डॉ.रिता मदनलाल शेटीया यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. असे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मा. मच्छिंद्र रुईकर आणि पँथर आर्मी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांनी सांगितले.
हा पुरस्कार वितरण सोहळा १ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता समाज वादी प्रबोधिनी हॉल, इचलकरंजी येथे होणार आहे. या कार्यक्रमास सामाजिक विचारवंत प्रा. डॉ. शरद गायकवाड, जेष्ठ पत्रकार डॉ दगडू माने, राजू घाटगे, शेतमजुरांचे नेते सुरेश सासने, मोहन मालवणकर (Annabhau Sathe Award ) राजेंद्र मोहीते, पत्रकार योगेश पांडव आणि ॲड. ममतेश आबळे, संजय कांबळे आणि नितेश दीक्षांत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Talegaon Dabhade: कै. डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्कार सोहळा संपन्न
तुम्ही तुमचे कार्य करत रहा त्याची दखल समाजाकडून/ संस्थांकडून घेतली जातेच याचा प्रत्यय रिता इंडिया फाउंडेशन च्या विश्वस्त संस्थापिका एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया आणि संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांना त्या करत असलेले सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि (Annabhau Sathe Award ) त्यासाठी त्यांना आता पर्यंत मिळालेले ४० पेक्षा जास्त पुरस्कार यावरून सिद्ध होते.
या माय लेकीनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतः डॉ. चे शिक्षण पूर्ण तर केलेच पण हे करत असतानाच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांनी स्वतः ला झोकून दिले …अगदी अलीकडे कोविड १९ च्या काळात त्यांनी रिता इंडिया फाउंडेशन च्या अंतर्गत केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. यासाठी त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार ही मिळालेला आहे. त्यांच्या कार्यातून त्यांनी आजच्या पिढी पुढे एक आदर्श निर्माण केला (Annabhau Sathe Award ) आहे.