मावळ ऑनलाईन – नवोदित नेमबाज अनघा सचिन काळोखे हिने ट्रॅप शूटिंग क्षेत्रात( Anagha Kalokhe) आपली चमक दाखवत राज्य पातळीवरील स्पर्धेत यश मिळवले. २८ वी एस.जे. कॅप्टन एझिकले शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये अनघाने युवा महिला, ज्यूनियर महिला आणि महिला अशा तीनही गटांमध्ये सुवर्णपदक पटकावली.
Industrial Highway : तळेगाव-चाकण-शिक्रापूर औद्योगिक महामार्गाचे होणार आधुनिकीकरण
ही राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा २६ ते २८ जुलै दरम्यान बालेवाडी येथील शॉटगन शूटिंग रेंजमध्ये आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून ८० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. डबल ट्रॅपमध्ये पारंगत असलेल्या अनघाने यंदा ट्रॅप शूटींग गटात भाग घेत विशेष कामगिरी केली.
Republican Sena : रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पानपाटील यांची नियुक्ती
दुसऱ्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत तिने ५० पैकी ३६ गुण मिळवत तीनही गटांमध्ये बाजी मारली. या यशामुळे अनघा ही महाराष्ट्रातून ट्रॅप शूटिंग गटातील नंबर १ शूटर ठरली आहे. ती सध्या बालेवाडी येथे हेमंत बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण ( Anagha Kalokhe) घेत आहे.